शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

कोल्हापूर : डी. वाय. पाटील फौंडेशनची ‘केटीएस’साठी २५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 18:47 IST

कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली.

ठळक मुद्देडी. वाय. पाटील फौंडेशनची ‘केटीएस’साठी २५ हजारांची मदतमहापालिका शाळेतील हुशार विद्यार्थ्यांचे होणार कौतुक

कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत राबविल्या जात असलेल्या कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली. महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील प्राथमिक शाळांतील २५ विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे वाटप तसेच कोल्हापूर टॅलेंट सर्चअंतर्गत यश मिळविलेल्या २५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडलचे वाटप आमदार पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षा अभियानांतर्गत ११७ दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले.शिक्षण समितीमार्फत राबविल्या जात असलेल्या ‘केटीएस’ उपक्रमाचे आमदार पाटील यांनी कौतुक केले. लहानवयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची सवय या उपक्रमामुळे लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिका शाळांतून राबविण्यात येणाऱ्या सर्वच उपक्रमांबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आयुक्त अभिजित चौधरी यांनी ‘केटीएस’ उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तोंडओळख लहानवयातच होण्यास मदत होणार आहे. त्यांच्या आयुष्याला एक निश्चित दिशा या उपक्रमामुळे मिळेल, असे सांगितले.

शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे यांनी सर्वांचे स्वागत केले, तर प्रास्ताविकात प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांनी महापालिका शाळेत राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती तसेच या शाळांचा शैक्षणिक विकास व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढीसाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जातात याची माहिती दिली तर पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांनी आभार मानले.समारंभास उपमहापौर महेश सावंत, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंती