शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बोगस बिगरशेती प्रकरणी फौजदारीचे आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदीच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 11:31 IST

शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधकांना दिले आहेत. त्यामुळे बिगरशेतीची बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीसह आणखी काही धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबोगस बिगरशेती प्रकरणी फौजदारीचे आदेशजिल्हाधिकारी कार्यालयात नोंदीच गायब एजंटांची टोळी सक्रीय; अनेक आदेश संशयाच्या भोवऱ्यातधक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता

कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधकांना दिले आहेत. त्यामुळे बिगरशेतीची बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीसह आणखी काही धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

ही सर्व प्रकरणे २००४ ते २००८ या काळातील असून, त्या कालावधीतील अप्पर जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार डी. डी. वळवी यांच्याकडे होता. या कालावधीतील जिल्ह्यातील सर्वच बिगरशेती आदेशाबाबत सत्यता पडताळणी मोहीम हाती घेण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांसह खरेदीदार, एजंटांचे धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यातील प्रभावी क्षेत्र, तसेच मोठ्या शहरालगतच्या शेतजमिनी बिल्डरांनी खरेदी केल्या आहेत. या जमिनी रहिवासी, औद्योगिक तसेच वाणिज्य कारणांसाठी बिगरशेती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येतात; पण २००४ ते २००८ या कालावधीत अनेक जमिनी बिगरशेती करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे; पण या बिगरशेतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड विभागात कागदोपत्री नोंदी नसल्याचे उघडकीस आले आहे.

अशा प्रकारची जिल्ह्यात अनेक प्रकरणे झाल्याचे हळूहळू उघडकीस येऊ लागल आहे. त्यामुळे या कालावधीतील सर्वच बिगरशेती झालेली प्रकरणे सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. तारदाळ, भेंडवडे, भेडसगाव, तसेच इचलकरंजी परिसरातील काही बोगस बिगरशेती झालेली प्रकरणे हाती लागली असून, त्यानंतरच ही प्रकरणे तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.

नोंदीच गायबजिल्ह्यात अशी हजारो प्रकरणे असल्याचे उघडकीस येत असून, त्यांच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याने हे बिगरशेतीचे आदेश मिळविलेच कसे? कोणी दिले? या आदेशावर स्वाक्षऱ्या कोणाच्या आहेत? याचीही पडताळणी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या चौकशीतून मोठी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अनेक बिगरशेतीचे आदेश बनावट असल्याचेही दिसून येत आहे.

एजंटांची टोळी उघडकीस येण्याची शक्यतातत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांनी त्यांच्या कालावधीत दिलेल्या बिगरशेतीच्या आदेशाची सत्त्यता पडताळणीचे काम सुरू असून, त्यासह बोगस दाखले तयार करून देणारीही एजंटांची टोळी उजेडात येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या एजंटांसह बांधकाम व्यावसायिकांत खळबळ माजली आहे.

 

हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील प्रामुख्याने बिगरशेतीचे प्रकरणे बोगस असल्याचे तलाठ्यांच्या लक्षात आले आहे. त्याबाबत काही बोगस बिगरशेतीचे आदेशही ताब्यात घेण्यात आले असून, त्याबाबत सत्यता पडताळणी करून फौजदारी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या कालावधीतील बिगरशेती झालेल्या प्रकरणांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न करण्याचे आदेश दिले आहेत.-अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी, कोल्हापूर. 

 

टॅग्स :collectorतहसीलदारkolhapurकोल्हापूर