शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कोथिंबीर कडाडली : ३० रुपये पेंढी, फळबाजारात स्ट्रॉबेरीची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:42 IST

गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली असून, कोथिंबीर चांगलीच कडाडली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर ३० रुपये झाला आहे. फळबाजारात विविध फळांसह स्ट्रॉबेरीची रेलचेल आहे. लालभडक स्ट्रॉबेरीचा बॉक्स १७५ रुपये झाला आहे. डाळी व कडधान्यांचे दर स्थिर असून खोबरे व खोबरेल तेलाच्या दरांत वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देकोथिंबीर कडाडली : ३० रुपये पेंढी, फळबाजारात स्ट्रॉबेरीची रेलचेल : खोबरे, खोबरेल तेलाच्या दरात वाढ

कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली असून, कोथिंबीर चांगलीच कडाडली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर ३० रुपये झाला आहे. फळबाजारात विविध फळांसह स्ट्रॉबेरीची रेलचेल आहे. लालभडक स्ट्रॉबेरीचा बॉक्स १७५ रुपये झाला आहे. डाळी व कडधान्यांचे दर स्थिर असून खोबरे व खोबरेल तेलाच्या दरांत वाढ झालेली आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक जोरात आहे. आवक वाढली असली तरी भाजीपाल्याचा त्या प्रमाणात उठावही होत असल्याने दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात प्रमुख भाज्यांच्या दरांत सरासरी पाच ते सहा रुपयांची वाढ झालेली दिसते. पाच रुपये किलोपर्यंत असणारा कोबी या आठवड्यात आठ रुपये ५० पैसे झाला आहे. वांग्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून ढबू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, दोडका या प्रमुख भाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. सरासरी १५ रुपयांपर्यंत असणारा टोमॅटो रविवारी रुपयांपर्यंत पोहोचला.

कोथिंबिरीची आवक एकदम कमी झाली आहे. मध्यंतरीच्या थंडीमुळे कोथिंबिरीच्या पिकाला फटका बसल्याने आवक मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोथिंबिरीची रोज ११ हजार पेंढ्याची आवक सुरू आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात सरासरी आठ रुपये असणारी पेंढी या आठवड्यात मात्र २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. किरकोळ बाजारात ३० रुपये पेंढी दर झाला. हरभरा पेंढीसह मेथी, पालक, पोकळा, चाकवताचे दर स्थिर आहेत.फळबाजारामध्ये मोसंबी, माल्टा, संत्री या फळांची आवक चांगली आहे. पिवळ्याधमक संत्र्यांनी बाजार फुलला असून, दर सरासरी ४० रुपयांपर्यंत राहिला आहे. डाळींब, बोरे, स्ट्रॉबेरीची रेलचेल सुरू आहे. लालभडक स्ट्रॉबेरीचा बॉक्स १७५ रुपयांपर्यंत आहे. सफरचंद, कलिंगडे, चिक्कूची आवक स्थिर असून बोरांची आवकही बऱ्यापैकी टिकून आहे.

तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरांत फारशी चढउतार दिसत नाही. सरकी तेल ८० रुपये, तर साखर ३४ रुपयांवर स्थिर राहिली आहे. ज्वारीच्या दरात थोडी वाढ सुरू असून किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलोपर्यंत दर राहिला आहे. खोबरे व खोबरेल तेलाच्या दरात थोडी वाढ झालेली आहे.

कांदा-बटाटा स्थिरकांदा व बटाट्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी सहा रुपये तर बटाटा १० रुपये दर राहिला आहे.संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गूळ तेजीतसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या मागणीत थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात गुळाचा दर सरासरी ३५०० रुपये क्विंटल राहिला असून, दरात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर