शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेचा ४.२८ कोटींचा ‘डीपीडीसी’ कडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:06 IST

लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणा खऱ्या अर्थाने सोमवारपासून गतिमान झाली. नगरोत्थान, दलित व दलितेतर वस्तीत सेवासुविधा पुरविणे, आदी कामांसाठीचा चार कोटी २८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव महानगरपालिका प्रकल्प विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला हा निधी तत्काळ मिळावा म्हणून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी वैयक्तिक चर्चा देखील केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेचा ४.२८ कोटींचा ‘डीपीडीसी’ कडे प्रस्तावआचारसंहिता संपल्यामुळे कामाला गती

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणा खऱ्या अर्थाने सोमवारपासून गतिमान झाली. नगरोत्थान, दलित व दलितेतर वस्तीत सेवासुविधा पुरविणे, आदी कामांसाठीचा चार कोटी २८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव महानगरपालिका प्रकल्प विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला हा निधी तत्काळ मिळावा म्हणून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी वैयक्तिक चर्चा देखील केली आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी संपली. गेल्या दोन महिन्यांपासून आचारसंहिता असल्यामुळे कोणती कामे करण्यावर मर्यादा होत्या. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाने घाईगडबडीने ३० कामांच्या वर्कआॅर्डर दिल्या होत्या. त्यानंतर नवीन असे कोणतेच काम मंजूर झाले नाही. नगरोत्थान अंतर्गत १0 कोटींचे सात रस्ते करण्याचे कामही त्यामुळे रखडले होते. निविदा प्राप्त झाल्यानंतर या कामाची सर्व प्रक्रिया करून ठेवली होती. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर शनिवारी हे काम स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले; त्यामुळे या कामाला आता गती मिळणार आहे.नवीन वर्षाकरिता जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेला निधी द्यावा म्हणून सोमवारी महानगरपालिका प्रशासनाने तीन कामांचे प्रस्ताव तयार करून दिले. त्यामध्ये दलित वस्ती सुधारणा, नगरोत्थान तसेच दलितेतर वस्तीत सेवासुविधा पुरविणे, आदी कामाच्या चार कोटी २८ लाखांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. हा निधी मिळताच निविदा प्रक्रिया राबविली जाईल.गेल्या दोन महिन्यांपासून आचारसंहितेत अडकलेली कामे पुन्हा गतीने होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांनी कोणत्याही फाईलवर सह्या केल्या नव्हत्या, आता मात्र त्यांना सबब न सांगता तुंबलेल्या फाईल्सवर सह्या करणे भाग पडले आहे. काही नगरसेवक स्वत: फाईल हातात घेऊन कार्यालयातून फिरताना दिसून आले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर