शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणूक उद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:09 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची निवडणूक उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार असून बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येक समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. त्यामुळे ‘एकास एक’ अशी लढत होणार असली तरी ताराराणी मार्केट प्रभाग समितीवर १०-१० असे समान संख्याबळ असल्याने सभापतिपदाचा निर्णय हा चिठ्ठी टाकून होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणूक उद्यातीनपैकी एका ठिकाणी चुरस

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची निवडणूक उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार असून बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येक समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. त्यामुळे ‘एकास एक’ अशी लढत होणार असली तरी ताराराणी मार्केट प्रभाग समितीवर १०-१० असे समान संख्याबळ असल्याने सभापतिपदाचा निर्णय हा चिठ्ठी टाकून होणार आहे.बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत प्रत्येक प्रभाग सभापतिसाठी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गांधी मैदान, शिवाजी मार्केट, बागल मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत प्रभाग समितींवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने तेथे आघाडीचे उमेदवार सहज विजय होऊ शकतात; परंतु ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत प्रभाग समितीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे दहा तर भाजप-ताराराणी आघाडीचे दहा असे समान सदस्य संख्याबळ असल्याने तेथे चिठ्ठी टाकून निर्णय घेतला जाणार आहे.यापूर्वी दोनवेळा ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापतिपदाची अशीच चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके विजयी ठरले होते. त्यामुळे यावेळी काय होते याबाबत उत्सुकता आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होत आहे.

उमेदवारी अर्ज भरलेल्यांची नावे -१. गांधी मैदान प्रभाग समिती - ललिता ऊर्फ अश्विनी बारामते (भाजप), प्रतीक्षा धीरज पाटील (काँग्रेस)२. शिवाजी मार्केट प्रभाग समिती - सुनंदा सुनील मोहिते (भाजप), माधवी प्रकाश गवंडी (राष्टÑवादी)३. बागल मार्केट प्रभाग समिती - कमलाकर यशवंत भोपळे (भाजप), शोभा धनाजी कवाळे (काँग्रेस)४. राजसिंह भगवान शेळके (ताराराणी), माधुरी संजय लाड ( कॉँग्रेस)

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर