शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शहरातील कचरा विलगीकरणासह शुल्क देऊन सहकार्य करा, ‘एकटी ’ च्या अनुराधा भोसले चे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:31 IST

कोल्हापूर शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापना, दुकाने आदींमध्ये होणाऱ्या  कचऱ्यांचे वर्गीकरणकृत काम ‘ एकटी ’ करीत आहे. त्यात कचरा विलगीकरण व शुल्क न दिल्यास हे काम सुरु ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. तरी या करीता सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरातील कचरा विलगीकरणासह शुल्क देऊन सहकार्य करा‘एकटी ’ च्या अनुराधा भोसलेचे आवाहनकोल्हापूर शहरात दररोज १८५ टन कचरा निर्मिती

कोल्हापूर : शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापना, दुकाने आदींमध्ये होणाऱ्या  कचऱ्यांचे वर्गीकरणकृत काम ‘ एकटी ’ करीत आहे. त्यात कचरा विलगीकरण व शुल्क न दिल्यास हे काम सुरु ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. तरी या करीता सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.भोसले म्हणाल्या, कचरा वेचक महीलांना रोजगार व त्यातून पर्यावरणाचे रक्षण या उद्देशाने ‘एकटी ’ संस्था गेल्या तीन वर्षापासून ‘शून्य कचरा व्यवस्थापन ’प्रकल्पावर काम करीत आहे.यातून प्रभाग क्रमांक ६७ व ६९ या दोन प्रभागात ‘घन कचरा व्यवस्थापन पथदर्शी प्रभाग निर्मिती प्रकल्प राबवित आहे. त्यातून गेल्या वर्षापासून २८४३ कुटूंबाचा रोजचा ओला व सुका कचरा वर्र्गीकरण केला जातो.

यामुळे २३ परिसर विकास भगिनींना रोजगार उपलब्ध आहे. या उपक्रमातून ४०० ते ६०० किलो ओल्या कचऱ्यांचे सेंद्रीय खत निर्माण केले जाते. यातील निरुपयोगी प्लास्टिक महापालिकेने बांधून दिलेल्या सार्टींग शेडमध्ये साठविले जात आहे.चार महिन्यापुर्वी कोल्हापूर महानगर पालिका व ‘एकटी ’ संस्थेमध्ये २८ एप्रिल २०१६ च्या घन कचरा व्यवस्थापनाच्या कायद्यानुसार शहरातील कचरा व्यवस्थापनाचा करार झाला.

त्यानूसार भाजी मार्केट, केश कर्तनालये, दुकाने, बँका, पतसंस्था, हॉटेल्स व कर्मशियल आस्थापना आदी ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्यांचे वर्गीकरणकृत पद्धतीने संकलन करण्याचेही काम संस्थेमार्फत सुरु करण्यात आले आहे.

६ भाजी मार्केट, ३४ हॉटेल्स, प्रभाग क्रमांक ३२, ३३ येथून कचरा उचलण्यास प्रारंभही केला आहे. मात्र, यातील बहुतांशी आस्थापना , दुकाने, हॉटेल्स, दुकाने सेवा शुल्क देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे संस्थेला मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दररोज १८५ टन कचरा निर्मिती होते. अपुरे मनुष्यबळ, अपुरे साहित्य, वाहतुक साधने, डंम्पिंग ग्राऊड ची सध्याची स्थिती याचा विचार करुन महापालिका स्थायी समितीने हा निर्र्णय घेतला आहे. तरी स्वच्छ कोल्हापूर , सुंदर कोल्हापूर साठी सर्वांनी कचरा विलगीकरणासह शुल्क देऊन सहकार्य करावे.यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, समन्वयक मनिषा पोटे, जैनुद्दीन पन्हाळकर, प्रकल्प अधिकारी राहूल संकपाळ, सविता कांबळे, मीरा माने, लक्ष्मी कांबळे, पार्वती कांबळे, आरती चोपडे, सारीका भोर आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Viralसोशल व्हायरल