शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंबाबाईच्या मंदिरात पगारी पुजारी विधेयकाचे कायद्यात रूपांतर, राज्यपालांची सही : गॅझेट प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:53 IST

कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीच्या विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सही होऊन गॅझेट प्रसिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देअंबाबाईच्या मंदिरात पगारी पुजारी विधेयकाचे कायद्यात रूपांतरराज्यपालांची सही : गॅझेट प्रसिद्ध

कोल्हापूर : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीच्या विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सही होऊन गॅझेट प्रसिद्ध झाले आहे.

या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊन पुजाऱ्यांचे वंशपरंपरागत हक्क कायदेशीररीत्या संपुष्टात आले आहेत. मात्र नव्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी किमान एक-दोन महिने लागणारआहे.

सुरुवातीला प्रशासक मंडळाकडून मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यात येणार आहे. त्यानंतर स्वतंत्र व्यवस्थापन समिती स्थापन केली जाईल. त्यामुळे आता मंदिराच्या नियमावलीनुसार व्यवस्थापन बनविण्याचा कामाला वेग येणार आहे.

अंबाबाई मूर्तीला गतवर्षी ९ जून २०१७ रोजी घागरा-चोलीचा पेहराव केल्यानंतर सुरू झालेल्या जनआंदोलनानंतर तेथील पारंपरिक पुजारी हटवून पगारी पुजारी नियुक्तीची मागणी करण्यात आली होती.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करीत नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत संमत करून घेतले आहे. मात्र राज्यपालांची सही आणि गॅझेट झाल्याशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. दरम्यान, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधेयकावर सही केल्यानंतर मंगळवारी त्याचे गॅझेटही प्रसिद्ध झाल्याने विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे.

या कायद्याबाबत लवकरच एक नियमावली करावी लागणार असून, याबाबत विधि व न्याय विभाग व सध्याची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.

नव्या अंबाबाई मंदिर कायद्यामध्ये आठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, पदसिद्ध सदस्य कोल्हापूरचे महापौर, एक महिला, अनुसूचित जाती व जमाती घटकांतील एक सदस्य यांचा समावेश असणार आहे.

ही समिती स्थापन होईपर्यंत मंदिराचा कारभार तात्पुरत्या दोनसदस्यीय समितीमार्फत चालविला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी किमान एक-दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखलया गॅझेट प्रसिद्धीनंतर श्रीपूजकांकडून कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यावर सुनावणी होऊन कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळू नये यासाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक व प्रताप वरुटे यांनीही उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.

पगारी पुजारी कायद्याविरोधात करवीरनिवासिनी श्रीपूजक मंडळ, मुनीश्वर व इतर श्रीपूजक यांनी दाद मागितल्यास आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. हे कॅव्हेट मंगळवारी उच्च न्यायालयात दाखल झाले आहे.

 

पगारी पुजारी विधेयक मंजूर झाल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात त्याचे गॅझेट होईल, असे आश्वासन दिले होते. आता ते पूर्ण झाले आहे. कायदाच इतका सक्षम केलेला आहे की त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले तरी त्याच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नाही.चंद्रकांत पाटील (पालकमंत्री)

 

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचे गॅझेट आता प्रसिद्ध झाले आहे; त्यामुळे पुजाऱ्यांचे देवीच्या पूजेचे व अन्य वंशपरंपरागत हक्क संपुष्टात आले आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रियाही लवकर करण्यात यावी.- इंद्रजित सावंत (इतिहास संशोधक)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmbadevi Mandirअंबादेवी संस्थान