शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कोल्हापूर : घनकचरा प्रकल्प पूर्णत्वाकडे, मंगळवारी आयुक्तांकडे सुनावणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:03 IST

लाईन बझार येथील घनकचरा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, अंतिम टप्प्यात काही अडचणी येत असतील, तर महापालिका संबंधित तांत्रिक कंपनींना रक्कम अदा करून, काम पूर्ण करून घेऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात प्रशासन प्रयत्न करीत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देघनकचरा प्रकल्प पूर्णत्वाकडेमंगळवारी आयुक्तांकडे सुनावणी होणार

कोल्हापूर : लाईन बझार येथील घनकचरा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, अंतिम टप्प्यात काही अडचणी येत असतील, तर महापालिका संबंधित तांत्रिक कंपनींना रक्कम अदा करून, काम पूर्ण करून घेऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात प्रशासन प्रयत्न करीत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.घनकचरा व्यवस्थापनाचे काम पुणे येथील ‘रोकीम’ कंपनीला देण्यात आले आहे. हा २०० टनाचा प्रोजेक्ट बीओटीवर साकारला जात आहे. त्यांनी मशिनरीच्या जॉबवर्कचे काम दुसऱ्या कंपनीला दिलेले आहे. दोन कंपन्यांतील आर्थिक विषय आहे. सब ठेकेदारास पैसे न दिल्याने त्याने दोन मशिनरी नेल्या आहेत.

उर्वरित सर्व मशिनरी जाग्यावर आहेत. २० तारखेला आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. महापालिकेने कंपनीला कोणतेही पैसे अदा केले नाहीत; मात्र काम रेंगाळल्यामुळे ‘रोकीम’ला दंड सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.निकम पार्क कंपौड पाडण्याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करून कारवाई झालेली नाही. जुनी मोरी कॉलनी येथे सावर्डेकर यांनी अतिक्रमण केलेले आहे. रि. स. नं. ७२२/ ३ येथील लेआऊटची फाईन टी. पी.मधून गहाळ झालेली आहे. लेकव्ह्यु अपार्टमेंटच्या ठिकाणी बिल्डरकडून रस्ते व मार्जिन सोडण्यात आलेले नाही. जर येत्या गुरुवारपर्यंत प्रभागातील प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर टिपीला टाळे ठोकणार, असा इशारा दीपा मगदूम यांनी दिला.निकमपार्क व नाल्याच्या बाजूच्या सर्वांना नोटिसा दिलेल्या आहे. त्यांचे उत्तर आलेले आहे. त्या ठिकाणी वैयक्तिक जागा असल्याने तेथील जागा भूसंपादन करावी लागणार आहे. संबंधित बिल्डरला नोटीस देण्यात आलेली आहे, असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.कचरा उठावाच्या टिपररिक्षा कधी सुरू करणार? अशी विचारणा सभापती आशिष ढवळे, प्रतिज्ञा निल्ले यांनी केली. तेव्हा टिपर रिक्षासाठी ११ निविदा आलेल्या आहेत. त्याची छाननी सुरू आहे. लवकरच त्या खरेदी केल्या जातील, असे सांगण्यात आले.रंकाळ्यामध्ये जैवविविधता धोक्यात येऊ नये म्हणून मासेमारीबाबत निर्णय घेण्यासाठी पर्यावरण विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.महापालिकेने ठेकेदारामार्फत जे चालक घेतलेले आहेत ते शिकाऊ आहेत. शिवाय त्यांना १४ हजार रुपये वेतन देतो. महापालिकेच्या मानधनावरील चालक १२ हजारमध्ये काम करतात. ठेकेदाराच्या चालकांना एवढे पैसे देऊन अपेक्षित रिझल्ट मिळत नाही, अशी तक्रार सभापती ढवळे यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर