शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे पुर्ण करणार : चंद्रकांत पाटील; इन्टरझोन स्पर्धेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:36 IST

कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे नजिकच्या काळात प्राधान्याने पुर्ण करुन हे संकुल पुर्णक्षमतेने कार्यान्वित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे पुर्ण करणार : चंद्रकांत पाटीलसिनियर इन्टरझोन स्पर्धेचा समारोप

कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे नजिकच्या काळात प्राधान्याने पुर्ण करुन हे संकुल पुर्णक्षमतेने कार्यान्वित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले.महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिशन आणि रेसिडेन्सी क्लबतर्फे विभागीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित केलेल्या सिनियर इन्टरझोन स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू देसाई, रेसिडेन्सी क्लबचे खलील अन्सारी, डॉ. सत्यवत सबनिस, डॉ. दिपक जोशी, शितल भोसले प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, विभागीय क्रीडा संकुल पुर्णक्षमतेने कार्यन्वित करण्यावर शासनाचा अधिक भर आहे. या क्रीडा संकुलातील अ‍ॅथलेटिक, जलतरण तलावासह अन्य विविध प्रकल्पांचे काम पुर्ण करुन ही दालने क्रीडाप्रेमींसाठी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. क्रीडा क्षेत्रातील विविध संघटना व असोसिशन यांच्या सक्रीय सहभागाने या संकुलामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन व्हावे.

रेसिडेन्सी क्लबचे खलील अन्सारी म्हणाले, विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सिंथेटिक टेनिस कार्ट, निर्माण करणे गरजेचे आहे त्यामुळे राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय टुर्नामेंटस याठिकाणी घेणे शक्य होईल. या कार्यक्रमात असोसिएशनचे शितल भोसले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सत्यवत सबनिस यांनी आभार मानले.

क्रीडा फेस्टिवलसाठी सहकार्यकोल्हापुरात क्रीडा फेस्टिव्हल आयोजित करुन विविध खेळांच्या स्पर्धा घेण्याबाबत स्टेट लॉन टेनिस असोसिएशनने यावेळी सुचविले. यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, क्रीडा फेस्टिवलसाठी स्टेट लॉन टेनिस असोशियशनने पुढाकार घ्यावा, शासनातर्फे क्रीडा फेस्टिव्हलसाठी सवर्ते सहकार्य केले जाईल. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर