शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:47 IST

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते आणि करावयाची पॅचवर्कची कामे यावर स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली. रस्त्यांवरील पॅचवर्क करण्याची कामे कधी पूर्ण करणार, असा संतप्त सवाल सदस्यांनी प्रशासनास विचारला; तर अनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देअनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करणारस्थायी समिती सभेत सदस्यांनी विचारला संतप्त सवाल

कोल्हापूर : शहरातील खराब रस्ते आणि करावयाची पॅचवर्कची कामे यावर स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली. रस्त्यांवरील पॅचवर्क करण्याची कामे कधी पूर्ण करणार, असा संतप्त सवाल सदस्यांनी प्रशासनास विचारला; तर अनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राहुल माने यांनी हा प्रश्न उपस्थित केला. डांबरी प्लॅँट अद्याप सुरू झालेला नाही. पॅचवर्कची कामे कधी पूर्ण करणार, अशी विचारणा माने यांनी केली. त्यावेळी पॅचवर्कची कामे सुरू आहेत. मिरवणूक मार्गावरील कामे प्राधान्याने केली जातील. तसेच ही कामे विसर्जन मिरवणुकीपूर्वी केली जातील, असे सांगण्यात आले.राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी शहरातील अनेक मिळकतधारकांना अर्ज करायचे असल्याने त्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी सूचना संजय मोहिते यांनी सभेत केली. तेव्हा ५ सप्टेंबरला मुदत संपली असून, यापूर्वी एकदा मुदतवाढ देण्यात आली होती. आता जर मुदतवाढ द्यायची असेल तर आयुक्तांची परवानगी आवश्यक असल्याचे अधिकार्‍यानी स्पष्ट केले.तक्रारी करण्यात आलेल्या ठिकाणची पाण्याच्या गळती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत, याकडे गीता गुरव यांनी अधिकार्‍याचे लक्ष वेधले. कचरा उठाव करण्यासाठी घेण्यात येत असलेली वाहनांची क्षमता आणि किंमत या दोन्ही गोष्टींचा विचार करावा, अशी सूचना राहुल माने यांनी केली.

आरोग्य कर्मचारी गणवेश व गमबूट वापरत नाहीत. त्यांना गणवेश वापरायला सांगा, अशी सूचना प्रतिज्ञा निल्ले यांनी केली. त्यावर कर्मचारी संघटना न्यायालयात गेली असल्याने त्यांना गणवेश देता आलेले नाहीत, असा खुलासा करण्यात आला.राजारामपुरी परिसरात सफाई कर्मचार्‍याची संख्या कमी आहे. गणेशोत्सव काळात या ठिकाणी भरपूर गर्दी होते. गर्दीच्या ठिकाणी रोज स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे निल्ले व संजय मोहिते यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांसह जनावरांच्या विषयावरही सभेत चर्चा झाली. रोज १० भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे तसेच भटक्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सभेत सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर