शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सुरू झालेली वाहतूक शनिवारी पुन्हा दुपारी १ ते ४ बंद, शिवाजी पुल स्ट्रक्चरल आॅडिट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 20:00 IST

ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार असल्याने या कालावधीत पुन्हा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पुलावरून अवजड वगळता सर्व वाहतूक सुरू होती. शनिवारी सायंकाळपासून पुन्हा ती सुरू होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देब्रिटिशकालीन शिवाजी पुलावरून सुरू झालेली वाहतूक शनिवारी दुपारी १ ते ४ पुन्हा बंदशिवाजी पुल स्ट्रक्चरल आॅडिट सुरूचजीपीआर टेस्ट शनिवारी

कोल्हापूर : ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार असल्याने या कालावधीत पुन्हा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पुलावरून अवजड वगळता सर्व वाहतूक सुरू होती. शनिवारी सायंकाळपासून पुन्हा ती सुरू होण्याची चिन्हे आहेत.जुन्या शिवाजी पुलाचे आयुर्मान संपल्याने या पुलाची भारक्षमता किती आहे, हे तपासण्यासाठी बुधवारपासून पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला होता. त्यामुळे गेले दोन दिवस येथून सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि.च्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईच्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स एजन्सीच्या पथकाने हे काम सुरू केले आहे.बुधवारी सकाळी स्ट्रक्चरल आॅडिटच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला. दोन दिवस हे काम चालले. दरम्यान शुक्रवारी रडारचा वापर करून पुलाची भारक्षमता चाचणी करण्यात येणार होती. परंतू त्याचे मापन करणारी यंत्रणाच न आल्याने शुक्रवारी नवीन पुलाचे आॅडिट सुरू करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच जुन्या पुलावरून अवजड वगळता सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली होती.

त्यामुळे या मार्गावरून कोल्हापुरात येणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुचाकी आणि चारचाकींची वाहतूक येथून सुरू होती. राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी दिवसभरातील कामकाजाचा संध्याकाळी आढावा घेतला.

जीपीआर टेस्ट शनिवारी शनिवारी रडारचा वापर करून जीपीआर टेस्ट (पुलाची भारक्षमता चाचणी) करण्यात येणार आहे. त्यातून दगडातील ठिसूळपणा, दोन दगडांच्या जोडकामामध्ये यापूर्वी वापरलेले रसायन अथवा सिमेंट यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत ही चाचणी होणार असल्याने या कालावधीत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग