शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद : दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:51 IST

पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्दे राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण्याखाली आहेत.गेल्या आठवड्यात धुंवाधार पावसाने जिल्ह्यात महापूर आणला होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी पावसाची उघडीप होती. परंतु ढगाळ वातावरणाने वातावरणामध्ये कमालीचा गारठा जाणवत होता.

धरणक्षेत्रातील पाऊस थांबल्याने राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद झाला. येथून ४,५०० क्युसेकने होणार विर्सग कमी होऊन तो आता १६००क्युसेकने सुुुरु आहे. त्याचबरोबर दुधगंगा धरणातून पाण्याचा विसर्ग दुपारी ३,५०० क्युसेकने कमी करण्यात आला असून येथून ४,५०० क्युसेक विसर्ग सुरु आहे.

पाण्याची पातळी कमी होत असून पंचगंगेची राजाराम बंधारा येथे पाणी पातळी सायंकाळी २५ .१० इंच राहीली. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. अद्याप २० बंधारे पाण्याखाली असून १० ग्रामीण, ३ राज्य, ५ प्रमुख जिल्हा, १७ इतर जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असून पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु आहे.जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गुरुवारी सकाळी आठपर्यंत ९.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये हातकणंगलेत २.०० मि.मी., शिरोळमध्ये १.००, पन्हाळ्यात ८.२९ , शाहूवाडी १५.६६, राधानगरी १२.३३, गगनबावडा १८.००, करवीर ७.७२, कागल ७.१४, गडहिंग्लज ३.१४, भुदरगड ८.८०, आजरा १५.००, चंदगड ९.५० मि.मी. पाऊस पडला आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर