शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील संभाजी पुलाची स्वच्छता, डीसीएफसी फौंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 10:53 IST

वाढलेली झाडेझुडपे, कचऱ्याचा कोंडाळा आणि प्रातर्विधीच्या दुर्गंधीत अडकलेल्या लक्ष्मीपुरी येथील छत्रपती संभाजी महाराज पुलाने मोकळा श्वास घेतला़. या पुलावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देलक्ष्मीपुरीतील संभाजी पुलाची स्वच्छताडीसीएफसी फौंडेशनचा उपक्रम

कोल्हापूर : वाढलेली झाडेझुडपे, कचऱ्याचा कोंडाळा आणि प्रातर्विधीच्या दुर्गंधीत अडकलेल्या लक्ष्मीपुरी येथील छत्रपती संभाजी महाराज पुलाने मोकळा श्वास घेतला़. या पुलावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुलाच्या स्वच्छतेनंतर रंगरंगोटी करून, फुलांची झाडे लावून रांगोळी काढण्यात आली़ डीसीएफसी फौंडेशनच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत डी. एम. एन्टरप्रायझेस, तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला़. गेल्या काही वर्षांपासून लक्ष्मीपुरीतील छत्रपती संभाजी पुलावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. महापालिका आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. या पुलाची दुरावस्था, तसेच ओंगळवाणे स्वरूप पाहून डीसीएफसी फौंडेशनच्या तरुणांनी या ठिकाणची जिजाऊंच्याजन्मदिनी स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला़, त्यांना डी. एम. एन्टरप्रायझेसचे सहकार्य मिळाले.

पुलावर स्वच्छता सुरू असल्याचे कळताच महापालिकेचे कर्मचारीही त्यामध्ये सहभागी झाले. या सर्वांच्या प्रयत्नातून अवकळा पसरलेल्या छत्रपती संभाजी पुलाला झळाली मिळाली़ स्वच्छता झाल्यानंतर पुलावर असलेल्या ढाल-तलवारी रंगविल्या. या ठिकाणी फुलझाडे लावली.

छत्रपती संभाजी महाराज पूल, असा फलकही लावून त्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आल्याने संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलला़. या स्वच्छता मोहिमेत प्रणव रणवरे, निखिल मोरे, विराज पोतदार, शुभम खेडेकर, सौरभ पाटील, डी. एम. ग्रुपचे अशुतोष जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते़

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर