शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

कोल्हापूर शहरात दिवसभर पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 18:11 IST

पाणीपातळीत फुटाने वाढ: सुतारमळ्यातील तीन कुटुंबांचे स्थलांतर

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२२ : गेले पाच दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरात शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दिवसभर सूर्यदर्शनही घडल्याने महापूर पाहण्यासाठी नागरिकांनी शिवाजी पुलावर प्रचंड गर्दी केली. पाणीपातळी झपाट्याने वाढू लागल्याने शुक्रवारी (दि. २१) दक्षता म्हणून शिवाजी पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद केली होती. शनिवारी अवजड वाहतूक वगळता ती पूर्ववत सुरू करण्यात आली. धरणक्षेत्रात पावसाचा ओघ सुरूच राहिल्याने नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, दिवसभरात राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी फुटाने वाढून ती ४२ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे.

 

 महापालिका आपत्कालीन यंत्रणा सतर्क -

शिवाजी पुलावरून दुचाकी वाहतूक सुरू 

पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दसरा चौकानजीकच्या सुतार मळ्यात काही घरांत पाणी शिरू लागल्याने दुपारनंतर तीन कुटुंबांना चित्रदुर्ग मठात स्थलांतरित करण्यात आले. गेले पाच दिवस मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा झाला आहे. नद्यांना पूर आले आहेत. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जयंती नालाही दुथडी भरून वाहू लागला आहे. शनिवारी दिवसभर कोल्हापूर शहरात पावसाने उघडीप दिली असली तरीही पंचगंगा नदीच्या पुराची पाणीपातळी वाढत आहे. सायंकाळपर्यंत जामदार क्लबनजीक पाणी कायम होते. कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यानजीक दिवसभरात पाणीपातळीत फुटाने वाढ झाली असून, ती ४२ पर्यंत पोहोचल्याने महापुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवाजी पुलावर पूर पाहण्यास गर्दी

गतवर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या पार्श्वभूमीवर पुराचे पाणी धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढू लागल्याने दक्षता म्हणून शुक्रवारी सायंकाळी शिवाजी पूल सर्व वाहतुकीस बंद करण्यात आला होता. त्यामुळे वडणगे, चिखली, आदी भागांतील अनेक नागरिकांना शियेमार्गे महामार्गावरून कोल्हापूर शहरात यावे लागले. शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप देऊन दिलासा दिल्यानंतर सकाळपासून शिवाजी पुलावरून फक्त दुचाकी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे अवजड वाहतुकीला या पुलावरून पूर्णत: प्रवेश बंद ठेवण्यात आला. शिवाजी पुलाजवळ चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या पुलावरून महापुराचे दृश्य पाहण्यासाठी आणि ते मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

वाहनांचे पार्किंग पुलानजीक

वडणगे गावी जाण्यासाठी पवार पाणंदमार्गावर पुराचे पाणी आहे; त्यामुळे या वडणगे फाट्यावरील पेट्रोल पंप आणि जयहिंद धाब्याच्या परिसरात दुचाकी उभी करून नागरिक वडणगेकडे रवाना होत होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी तसेच नव्या पुलाशेजारील जागेत मोठ्या प्रमाणावर दुचाकी पार्किंगची गर्दी झाल्याचे दिसत होते.

सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्लीवर लक्ष

पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी वाढत असल्याने जयंती नाल्याच्या पाण्याला फुग येऊन हे पाणी सुतारमळा आणि शाहूपुरी कुंभार गल्लीत पसरत आहे. त्यामुळे दक्षता म्हणून महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. या दोन्ही ठिकाणी तसेच शुक्रवार पेठेतील पंचगंगा नदीच्या पुराच्या वाढणाऱ्या पाण्यावर ही यंत्रणा लक्ष ठेवून आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता मिलिंद गवळी यांनी पाणी शिरणाऱ्या भागांची पाहणी केली.