शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहराची हद्दवाढ, खंडपीठ होणारच; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:08 IST

हद्दवाढ प्रस्तावात पिरवाडीचा चुकून उल्लेख - क्षीरसागर 

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आठ गाव महापालिका हद्दीत घेण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असून, सर्वांना बरोबर घेऊन हद्दीवाढीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी दिली.आबिटकर म्हणाले, सीमा भागातील प्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. सीमाप्रश्नी जी उच्चाधिकार समिती स्थापन झालेली आहे, ती सातत्याने या प्रश्नाचा आढावा घेत आहे. या भागातील मराठी बांधवांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कोल्हापूर खंडपीठाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, खंडपीठाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.

हद्दवाढ प्रस्तावात पिरवाडीचा चुकून उल्लेख - क्षीरसागर कोल्हापूर : हद्दवाढीच्या प्रस्तावात पिरवाडी या गावाच्या नावाचा चुकून उल्लेख झाला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी या गावांसह आठवे गाव म्हणून नवी उजळाईवाडी या गावाचा समावेश करण्याचे ठरले होते. याबाबत तत्काळ महानगरपालिका प्रशासकांना दिलेल्या पत्रात सुधारणा करून नवी उजळाईवाडी या गावाचा हद्दवाढीत समावेश करण्याबाबत सुधारित पत्र आज, सोमवार रोजी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अलमट्टीची उंची वाढवू देणार नाहीअलमट्टी धरणाच्या उंचीसंदर्भात नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सेक्रेटरींनी कर्नाटक राज्याच्या जलसंपदा सेक्रेटरींशी चर्चा केली आहे. या चर्चेत अलमट्टी धरणाची उंची ५१७.५ पर्यंत स्थिर ठेवण्यावर एकमत झाले आहे. अलमट्टी धरणाची उंची ५१८ पर्यंत गेली; तर कोल्हापूरला महापूर येईल, त्यामुळे त्यापुढे ही उंची काही झाले तरी वाढवू देणार नाही. परंतु पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला तर यंदा कोल्हापूरला महापूर येणार नाही. त्यासाठी कर्नाटक सरकारशी महाराष्ट्र जलसंपदाचे सेक्रेटरी तसेच अधिकारी योग्य समन्वय राखून आहेत.