शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशभर सुरू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराला पोलीस छावणीचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 11:44 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवारी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महत्त्वाचे चौक, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा पाहून शहराला छावणीचे रूप आल्याचे दिसत होते.

ठळक मुद्देदेशभर सुरू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराला पोलीस छावणीचे रूपसशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात

कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवारी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महत्त्वाचे चौक, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा पाहून शहराला छावणीचे रूप आल्याचे दिसत होते.नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात महाराष्ट्रासह १५ राज्यांत विद्यार्थी व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनात उतरले होते. शुक्रवारी कोल्हापुरात काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले.

पोलीस मुख्यालयात सकाळी १0 वाजता पोलिसांचा फौजफाटा बोलवून त्यांना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी सूचना दिल्या. मुख्यालयातील सायबर विभाग, जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा यांसह राज्य राखीव दलाचे जवान, भारत बटालियनचे जवान, आदी सर्व विभागांतील कर्मचारी बंदोबस्तासाठी बाहेर पडले होते.

सकाळी १0 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण शहरात सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रस्त्यावर पोलीस उतरल्याने शहरात कोठेही दंगल, अनुचित प्रकार घडला नाही.

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर