शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Circuit Bench: सहा जिल्ह्यातील तीन हजार पोलिसांचे मुंबई हेलपाटे थांबले

By उद्धव गोडसे | Updated: August 12, 2025 16:00 IST

वेळेसह पैशांची बचत : कार्यक्षमता सुधारणार, सहा जिल्ह्यांतील पोलिसांना फायदा

उद्धव गोडसेकोल्हापूर : उच्च न्यायालयातील कामकाजासाठी दर महिन्याला सहा जिल्ह्यांतून सुमारे तीन हजार पोलिसांनामुंबईला जावे लागत होते. यातून वेळ, पैसे मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागत होते. याशिवाय पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. कोल्हापूर सर्किट बेंचमुळे पोलिसांचा मुंबईला होणारा हेलपाटा थांबला असून, वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. तसेच न्यायालयात प्रलंबित असलेले खटले वेळेत निकाली निघण्यास मदत होणार आहे.जामीन अर्जावर म्हणणे मांडणे, गुन्ह्यांच्या तपासाची माहिती सादर करणे, खटल्यांची सुनावणी, अपील किंवा रिटमध्ये बाजू मांडणे, अनेक कामांसाठी पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयात जावे लागत होते. कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी आठ ते १० तासांचा वेळ जातो. वेळेत पोहोचावे, यासाठी सुनावणीच्या आदल्या रात्रीच एसटी, खासगी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेने निघावे लागत होते. मुंबईत पोहोचल्यानंतर हॉटेल, लॉजिंग यासाठी पैसे खर्च करावे लागतात. सुनावणीचे कामकाज संपल्यानंतर मुंबईतून बाहेर पडण्यात दिवस जात होता.पुन्हा रात्रभर प्रवास करून कोल्हापुरात पोहोचावे लागत होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यातील ड्यूटीला हजर राहावे लागायचे. तासाभराच्या न्यायालयीन कामासाठी दोन रात्री आणि एक दिवसाचा वेळ जात होता. प्रवास, जेवण आणि राहण्यासाठी एका व्यक्तिला किमान तीन ते चार हजार रुपये खर्च करावे लागत होते. सर्किट बेंचमुळे खर्च आणि वेळेची बचत होणार आहे.

गतिमान न्यायमुंबईत प्रलंबित खटल्यांची संख्या जास्त असल्याने खटले निकाली निघण्यास विलंब होत होता. आता कोल्हापूर सर्किट बेंचकडे पहिल्या टप्प्यात ५० ते ६० हजार खटल्यांचे कामकाज असेल. सहा जिल्ह्यांसाठी स्वतंत्र सर्किट बेंच मिळाल्यामुळे कामकाज गतिमान होऊन वेळेत न्याय मिळेल, अशी भावना पोलिसांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यातून दरमहा सुमारे ६०० ते ७०० पोलिस मुंबई उच्च न्यायालयात जात होते.

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही फेरीकामासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाणाऱ्या अधिकाऱ्यांना शासकीय वाहन दिले जाते. यासाठी एक चालक, एक मदतनीस याशिवाय गरजेनुसार इतर कर्मचारीही सोबत घेऊन जावे लागत होते. यांचा खर्च मोठा होता. आता सर्किट बेंचमध्ये काम होणार असल्याने शासकीय खर्चात बचत होणार आहे.