कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ १६ ऐवजी १७ ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सूचनेनुसार समारंभाची तारीख बदलण्यात आली.सर्किट बेंच उद्घाटनाचा क्षण सर्वसामान्यांना अनुभवात यावा, यासाठी सार्वजनिक ठिकाणी समारंभाचे आयोजन करण्याचा विचार सुरू आहे. असा निर्णय झाल्यास दसरा चौकात उद्घाटन समारंभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ १६ ऑगस्टला होणार असल्याचे जिल्हा बार असोसिएशनने जाहीर केले होते. मात्र, त्याच दिवशी सरन्यायाधीश गवई हे मंडणगड येथील एका समारंभास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील समारंभ १६ ऐवजी १७ ऑगस्टला घेण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार १७ ऑगस्टला उद्घाटन समारंभ होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाणही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसरा चौकातील मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशीही चर्चा सुरू आहे. ऐनवेळी ठिकाणात बदल झाल्यास हातात पर्याय असावा, यासाठी जिल्हा बार असोसिएशनने खासदार शाहू छत्रपती यांच्याकडे दसरा चौकातील मैदानासाठी पत्रव्यवहार केला आहे.
Kolhapur: सर्किट बेंचचे उद्घाटन आता १६ ऐवजी १७ ऑगस्टला, ठिकाणही बदलण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:58 IST