शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आवक वाढल्याने कोथिंबीर निम्म्यावर, भाजीपाल्याच्या दरातही घसरण : कडधान्याचे दर मात्र स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:29 IST

महिन्या-दीड महिन्यापासून घाऊक बाजारात दहा रुपये असणारी कोथिंबिरीची पेंढी आता पाच रुपयांवर आली आहे, आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.

ठळक मुद्देआवक वाढल्याने कोथिंबीर निम्म्यावर भाजीपाल्याच्या दरातही घसरण : कडधान्याचे दर मात्र स्थिर

कोल्हापूर : महिन्या-दीड महिन्यापासून घाऊक बाजारात दहा रुपये असणारी कोथिंबिरीची पेंढी आता पाच रुपयांवर आली आहे, आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.

गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरातही घसरण दिसत असून, घाऊक बाजारात किलोमागे दर चार रुपयांनी कमी झाले आहेत. डाळी व एकूणच कडधान्यांच्या दरांत मात्र फारसा चढउतार दिसत नाही. फळबाजारात अननस, तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढली असून, सीताफळाची रेलचेलही दिसत आहे.

या आठवड्यात कोथिंबिरीची आवक वाढल्याने दर गत आठवड्यापेक्षा निम्म्यावर आले आहेत. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात कोथिंबीर, पालेभाज्याचे असे ढीग लागले होते. (छाया- नसीर अत्तार) पावसाळा सुरू झाल्यानंतर कोथिंबिरीची आवक एकदम कमी झाली होती. त्यामुळे घाऊक बाजारात १० ते १५ रुपये, तर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपये पेंढीपर्यंंत दर होता. या आठवड्यात आवक वाढली आहे. रविवारी कोल्हापूर बाजार समितीत ३००० पेंढ्यांची आवक झाल्याने दर एकदम घसरले आहेत.

घाऊक बाजारात सरासरी ३०० रुपये शेकडा दर झाल्याने किरकोळ बाजारातही दर खाली आले आहेत. भाजीपाल्याची आवकही हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू असून कोबी, वांगी, ढबू, घेवडा, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडका व फ्लॉवर या प्रमुख भाज्यांचे दर गत आठवड्यापेक्षा कमी आहेत.

साधारणत: किलोमागे दरांत तीन ते चार रुपयांची घसरण झालेली दिसते. पालेभाज्यांचे दरही काहीसे कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात मेथी, पोकळ्याची पेंढी दहा रुपये तर पालक पाच रुपये पेंढी आहे.कडधान्य बाजारात एकदम शांतता आहे. आवक व उठाव फारसा नसल्याने दरात चढउतार दिसत नाही. गहू, ज्वारी, नाचणीचे दर स्थिर आहेत. तूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळ, मसूरडाळ या प्रमुख डाळींसह सरकी तेल, साखर, मैदा, आटा यांचे दरही कायम आहेत. मसाल्याचे तीळ, जिरे, खसखस, खोबऱ्याच्या दरांत किरकोळ प्रमाणात वाढ झाली असून, एकूण ही बाजारपेठ शांत आहे.

फळबाजारामध्ये अननस, तोतापुरी आंब्यांची रेलचेल वाढली आहे. तोतापुरीची आवक रोज २८ टनांपर्यंत गेली असून, गत आठवड्याच्या तुलनेत आवकेत दुप्पट वाढ झाल्याने शहराच्या प्रत्येक चौकाचौकांत हातगाड्यांवर पिवळाधमक तोतापुरी पाहावयास मिळत आहे. ‘दशेरी’, ‘निलम’ आंब्यांचा हंगामही अंतिम टप्प्यात असून बाजार समितीत किरकोळ प्रमाणात त्याची आवक होत आहे.

कांदा वधारला!गत आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक निम्म्यावर आल्याने दर चांगलेच वधारले आहेत. घाऊक बाजारात चांगला कांदा १५ रुपयांना झाला असून, सरासरी दर बारा रुपयांपर्यंत आहे. बटाटा व लसणाची आवक कमी-अधिक असली तरी दरात मात्र फारसा फरक दिसत नाही. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर