शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवडावमधील शाळकरी मुलाला जीवदान, ‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:59 IST

दूचाकी अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होऊन किडनीला (मुत्रपिंड) मोठी दुखापत झालेल्या जिल्हयातील शिवडाव (ता. भुदरगड) मधील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अ‍ॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

ठळक मुद्दे‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआरअ‍ॅब थेराद्वारे किडनीवर शस्त्रक्रिया शिवडावमधील शाळकरी मुलाला जीवदान,४० दिवसानंतर डिस्चार्ज

कोल्हापूर : दूचाकी अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होऊन किडनीला (मुत्रपिंड) मोठी दुखापत झालेल्या जिल्हयातील शिवडाव (ता. भुदरगड) मधील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अ‍ॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

निलेश अनिल जाधव (वय १६) असे या मुलाचे नांव आहे. त्याच्या किडनीचे काम पूर्ववत सुरु झाले असून तो पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. रामानंद म्हणाले, शिवडाव येथे दूचाकी अपघातात निलेश जाधव हा २२ नोव्हेंबर २०१७ ला जखमी झाला होता. त्याच्या पोटाला मार बसून उजव्या किडनीला मोठी दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्याचा रक्तदाबही कमी झाला होता.

त्याची सोनाग्राफी केली असता किडनीभोवती रक्त जमा झाले होते. त्यामुळे त्याला प्रथम कडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. पण, प्रकृति गंभीर असल्याने त्याला तत्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून सीपीआरमध्ये आणले.

सुमारे चार तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. त्यासाठी चार रक्ताच्या बाटल्या लागल्या. ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. रक्तपोटाच्या मागच्या बाजुला पसरल्याने पोटाची क्षमता कमी झाली होती.

ही किडनी काढून टाकण्यात आली. परंतु, मोठ्या प्रमाणात रक्त गोठवून राहिल्याने पोटाचा आकार व क्षमता कमी झाली होती. शस्त्रक्रियेनंतर पोट टाके घेऊन बंद करणे शक्य नव्हते.म्हणून ‘अ‍ॅब-थेरा’ (पोट बंद न करता) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन एका कृत्रिम आवरणाने झाकण्यात आले. तसेच छातीमध्ये नळी टाकून साठलेले रक्त काढले.निलेशच्या शस्त्रक्रियेनंतर त्याला तीन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले. यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करुन कृत्रिम आवरण काढून टाकून पोट पूर्णपणे बंद केले. दोन दिवसानंतर श्वसनाची नळी व १४ व्या दिवशी छातीची नळी काढली व त्याचे खाणे सुरु झाले आणि तो चालू-फिरु लागला. ४० दिवसानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कौस्तुभ मेंच, डॉ.मधूर जोशी, डॉ. नीता भुरट यांनी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ञ्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. दिपाली, डॉ.राहूल पाटील, डॉ.राऊत यांचे सहकार्य मिळाले.यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे उपस्थित होते.यााबाबत निलेशचे मामा उत्तम भिकाजी यादव म्हणाले, निलेशची आई शेतकाम तर वडिल गवंडी काम करतात. तो तांबाळे हायस्कुल नववीमध्ये शिक्षण घेत आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर चांगले उपचार केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल