शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर- मुलांना लागेल आता शाळेत एकच वही...वेळापत्रकात बदल, दफ्तरांचे झाले ओझे कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:04 IST

वेळापत्रकात बदल, सर्व विषयांसाठी अथवा दोन विषयांसाठी एक वही, ई-लर्निंगच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील १८० शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी केले आहे.

ठळक मुद्दे. चालू शैक्षणिक वर्षातील नवीन पुस्तके घरी अभ्यासासाठी वापरण्यास दिली

संतोष मिठारी-

कोल्हापूर : वेळापत्रकात बदल, सर्व विषयांसाठी अथवा दोन विषयांसाठी एक वही, ई-लर्निंगच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील १८० शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी केले आहे. गेल्या सात वर्षांपासून शाळांनी या विविध संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.

इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ दिला जाऊ नये. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असू नये, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने कोल्हापूर शहरातील याबाबतची स्थिती जाणून घेतली. दप्तराचे वाढते ओझे ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनांनुसार शहरातील शाळांनी विविध संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. विद्यापीठ मराठी शाखा शाळेने वेळापत्रकात बदल, दोन विषयांसाठी एक वही, वर्ग कोपरा आणि ई-लर्निंगच्या माध्यमातून दप्तराचे ओझे घटविले आहे.

दर शनिवारी ‘विनादप्तर शाळा’ भरविण्यात येते. त्या दिवशी ज्ञानरचनावादी शिक्षण दिले जाते. शाळेने विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचे वजन दहा टक्के ठेवले आहे. कदमवाडी येथील महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिरात गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षातील पुस्तके जमा करून घेऊन ती वर्ग अभ्यासासाठी बेंचीसमध्ये कायमस्वरूपी वर्गातच ठेवण्यात आली आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील नवीन पुस्तके घरी अभ्यासासाठी वापरण्यास दिली आहेत. त्यामुळे ५० टक्के ओझे कमी झाले आहे. शाहूपुरीतील वसंतराव चौगुले विद्यालयात सर्व विषयांसाठी एकच वही वापरण्याची संकल्पना राबविली जाते. या शाळांची ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. शहरातील महानगरपालिका, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा १८० शाळांनी दप्तराचे ओझे कमी केले आहे. 

महानगरपालिकेच्या हद्दीतील एकूण १८० शाळांमध्ये दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येत आहेत. महापालिकेच्या २६ शाळांमध्ये ई-लर्निंग दिले जाते. ही सुविधा वाढविली जाणार आहे. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ न देण्याबाबत शाळांना सूचना दिल्या जातील.- एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, महानगरपालिका शिक्षण मंडळ

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शहरातील शाळांनी याआधीच पावले टाकली आहेत. आता शासनाच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांचा आकार कमी करावा. पालकांनी डबा आणि पाण्याची बाटली स्वतंत्रपणे द्यावी.- संतोष आयरे, शिक्षक.

सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. अनेक शाळांनी त्या दृष्टीने पावले टाकली आहेत. त्यांची व्याप्ती वाढावी. सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी.- उमा पाटील, पालक.

आणखी ओझे कमी करण्यासाठी वार्षिक अभ्यासक्रमांची पुस्तके सहामाहीपर्यंत आणि त्यानंतर अशी दोन टप्प्यांत शासनाने तयार करावीत. विद्यार्थ्यांचा अभ्यास हा शाळांमध्ये घेण्यात यावा.- राजेश वरक, शिक्षक

शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील ओझे आणखी कमी होणार असल्याने विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे.- जाहीद शिकलगार, पालक...........................................................................................................................................

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीGovernmentसरकार