शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार, सळसळत्या मिरवणुका, पोवाडे, घोषणांनी दुमदुमले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:17 IST

भारताच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवून पारतंत्र्याविरोधात कसं लढायचं असतं, याचे जितेजागते उदाहरण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती कोल्हापूर शहरामध्ये अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. फडफडणारे भगवे ध्वज, लहरणाऱ्या भगव्या पताका, शिवशाहिरांचे खडे बोल, जोडीला मर्दानी खेळ आणि अखंड चाललेला शिवघोष असे भारदस्त आणि मराठमोळे वातावरण मंगळवारी कोल्हापूरने अनुभवले. रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर शिवजयंतीचाच जल्लोष पाहावयास मिळाला.

ठळक मुद्दे छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकारसळसळत्या मिरवणुका, पोवाडे, घोषणांनी दुमदुमले शहर

कोल्हापूर : भारताच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवून पारतंत्र्याविरोधात कसं लढायचं असतं, याचे जितेजागते उदाहरण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती कोल्हापूर शहरामध्ये अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली.

फडफडणारे भगवे ध्वज, लहरणाऱ्या भगव्या पताका, शिवशाहिरांचे खडे बोल, जोडीला मर्दानी खेळ आणि अखंड चाललेला शिवघोष असे भारदस्त आणि मराठमोळे वातावरण मंगळवारी कोल्हापूरने अनुभवले. रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर शिवजयंतीचाच जल्लोष पाहावयास मिळाला.शहरातील चौकाचौकांत मंडप उभारून शिवप्रभूंच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा असणारे फलक सर्वच नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मर्दानी खेळ, व्याख्याने, प्रतिमापूजन, पाळणा अशा विविध माध्यमांतून सिंहासनाधीश्वर शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग जाणवत होती. शिवज्योती घेऊन आलेले शिवभक्त अनेक ठिकाणी स्वागत स्वीकारत होते. भगवे फेटे बांधलेल्या आणि कपाळावर अष्टगंध लावलेल्या युवकांमुळे पेठापेठांतून शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाने सकाळी शिवजन्मकाळ साजरा केला. याचवेळी संयुक्त जुना बुधवार पेठेनेही शिवजन्मकाळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘संयुक्त राजारामपुरी’तर्फे पहाटे शिवज्योत आणून त्यानंतर शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. विविध संस्था, तरुण मंडळांच्या वतीने जागोजागी शिवपुतळ्यांचे व प्रतिमांचे पूजन करण्यात आले होते.सायंकाळी पाचनंतर शहराच्या विविध भागांतून शिवपुतळ्यासह आणि शिवप्रतिमांसह जंगी मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशांचा गजर, हलगी-घुमक्याचा कडकडाट, लेसर शोपासून केरळच्या चंडीवाद्यापर्यंतची पथके, लेझीम पथकासह बेंजोच्या तालात या मिरवणुका काढण्यात आल्या.

शाहीर देशमुख गातो पोवाड्याला...!शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांमुळे आजही शिवजयंतीच्या उत्साहात भर घातली जाते, यात शंका नाही. खणखणीत आवाज, प्रसंग डोळ्यांसमोर उभा करण्याची निवेदनशैली, त्याला आवश्यक असणारा आवाजातील चढउतार यांमुळे गेली अनेक वर्षे शाहीर देशमुख यांचे पोवाडे मराठी मनांमध्ये चैतन्य निर्माण करतात. शिवाजी महाराजांबरोबरच बाजी, तानाजी, येसाजी यांच्याही कर्तृत्वाला यानिमित्ताने उजाळा मिळाला. 

 

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८kolhapurकोल्हापूर