शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कोल्हापूर : नव्या अवजड वाहनांची फिटनेस तपासणीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 10:53 IST

ट्रक, कंटेनर, टेम्पो, बस अथवा खासगी आराम बस नव्याने खरेदी केल्यानंतर आठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी फिटनेस तपासणी केली जाणार आहे. यासह राष्ट्रीय परमीटसाठी दोन चालकांची अटही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.

ठळक मुद्देआठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी होणार तपासणीप्रादेशिक परिवहनचा नवा नियम; राष्ट्रीय परमीटसाठी दोन चालकांची अट रद्द

कोल्हापूर : ट्रक, कंटेनर, टेम्पो, बस अथवा खासगी आराम बस नव्याने खरेदी केल्यानंतर आठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी फिटनेस तपासणी केली जाणार आहे. यासह राष्ट्रीय परमीटसाठी दोन चालकांची अटही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.देशाच्या एका टोकापासून हजारो मैलांचा प्रवास करीत धावणारी अवजड वाहने तंदुरुस्त असावीत; यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने फिटनेसच्या बाबतीत नवीन नियम व अटी तयार केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यात नवीन अवजड वाहने यात प्रवासी व मालवाहतूक अशा वाहनांना आठ वर्षांपर्यंत प्रत्येक दोन वर्षांनी त्याची तंदुरुस्ती चाचणी केली जाणार आहे.

प्रत्येक वर्षी अशा वाहनधारकांना किमान दोन दिवसांचा वेळ काढून वाहनांची तपासणी करावी लागत होती. यात श्रम, पैसा , वेळ लागत होता; त्यामुळे आता नव्या नियमाप्रमाणे हा वेळ व पैसा वाचणार आहे. यासह फुल्ली बिल्टअप अवजड वाहनेही कंपन्या तयार करून देऊ लागली आहेत, अशा वाहनांची तपासणी अशाच पद्धतीने होणार आहे.राष्ट्रीय परमीट असलेल्या वाहनांवर प्रत्येकी दोन चालक असावेत, अशी अट होती. त्यात दुरुस्ती करून एकच चालक ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे; त्यामुळे काही प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.ट्रॅव्हलर्सच्या मनमानीला चापदीपावलीच्या सुट्टीत चाकरमानी लोक आपआपल्या गावी जातात. यात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत ट्रॅव्हलर्स चालक मनमानी भाडे आकारतात. ही आराम बस चालकांची मनमानी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोडीत काढली.

या दरम्यान सलग दोन दिवस कारवाईचा बडगा उगारला. त्यात पाच ट्रॅव्हलर्सना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून योग्य खुलासा न आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा अहवाल परिवहन आयुक्त कार्यालयास पाठविण्यात येईल, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर