शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘मुद्रा’च्या कर्जदारांची शहानिशा करणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:51 IST

अनेक बँकांनी मुद्रा योजनेतून दिलेल्या कर्जांची सांगितलेली आकडेवारी पाहिल्यास, जिल्ह्याचा विकासदर आणि उद्योगही वाढले असते; पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या कर्जदारांची शहानिशा आपण करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून ‘मुद्रा’ योजनेंतर्गत यंदा एक हजार जणांना कर्ज देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘मुद्रा’च्या कर्जदारांची शहानिशा करणार : चंद्रकांत पाटीलबॅँक अधिकारी धारेवर : ‘अण्णासाहेब पाटील’द्वारे एक हजार जणांना कर्ज

कोल्हापूर : अनेक बँकांनी मुद्रा योजनेतून दिलेल्या कर्जांची सांगितलेली आकडेवारी पाहिल्यास, जिल्ह्याचा विकासदर आणि उद्योगही वाढले असते; पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या कर्जदारांची शहानिशा आपण करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून ‘मुद्रा’ योजनेंतर्गत यंदा एक हजार जणांना कर्ज देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठीची समन्वय समिती व बॅँक अधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, ‘नाबार्ड’चे नंदू नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक जे. बी. करीम, आदी प्रमुख उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, ज्यांना काहीही मिळत नाही, अशांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना आखली; परंतु आम्हांला आदेश नाही, अमुक कागद नाहीत, असे सांगून कर्जप्रकरणे नाकारली जातात, असे सांगत ज्या कारणांनी बँका कर्ज नाकारतात, त्या कारणांचा पाढाच पालकमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांसमोर वाचला. या संदर्भात १५ जूनला बैठक घेण्यात येईल. यामध्ये प्रत्येक बँकेने या विषयाचा १ एप्रिल ते १५ मेपर्यंतचा आढावा सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले.‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या माध्यमातून मुद्रा योजनेतून घेतलेल्या १० लाख रुपयांपर्यंतच्या संपूर्ण कर्जाच्या व्याजाची हमी शासन देते. असे असतानाही बँकांना आनुषंगिक तारण व जामिनाची आवश्यकता का भासते, अशी विचारणा करून या वर्र्षी या महामंडळाच्या माध्यमातून मुद्रा योजनेअंतर्गत किमान एक हजार तरुण-तरुणींना उद्योग-व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरbankबँक