शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

कोल्हापूर : रंकाळा उद्यानात झाडांचा केक कापून वाढदिवस, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमींची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:51 IST

वृक्षो रक्षिति रक्षित:’ या सुभाषिताप्रमाणे जुना वाशी नाका येथील रंकाळा उद्यानात रंकाळाप्रेमी, वृक्षपे्रमी यांच्यासह नागरिकांच्या साक्षीने झाडांचा चौथा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला.

कोल्हापूर : ‘वृक्षो रक्षिति रक्षित:’ या सुभाषिताप्रमाणे जुना वाशी नाका येथील रंकाळा उद्यानात रंकाळाप्रेमी, वृक्षपे्रमी यांच्यासह नागरिकांच्या साक्षीने झाडांचा चौथा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात झाल्यावर सर्व वृक्षप्रेमींचे स्वागत, झाडांची विधीवत पूजा, मान्यवरांच्या हस्ते सर्व वृक्षांना सेंद्रिय खत, ताक, गोमूत्र व पाणी घालण्यात आले. यावेळी उपमहापौर महेश सावंत यांच्या हस्ते केक कापून टाळ्यांच्या गजरात व जल्लोषात ‘वृक्षांचा वाढदिवस’ साजरा करण्यात आला.

दिनकर कमळकर यांनी प्रास्ताविक केले. महेश सावंत म्हणाले, रंकाळा उद्यानात पाण्याची टाकी, बेंच, ओपन जिम, मुलांची खेळणी आदींची व्यवस्था तातडीने करून देऊ. रंकाळा परिघातील सर्व उद्यानांमध्ये २०० झाडे लावल्याबद्दल राजेश कोगनूळकर व परिवाराचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कोगनूळकर म्हणाले, रंकाळा परिसर म्हणजे अनेक नागरिकांना मोफत आॅक्सिजन पुरविणारे हृदय आहे; पण रंकाळ्यात होणाऱ्या प्रदूषणामुळे त्याला उतरती कळा लागलेली आहे. प्रा. मोहन मतकर यांनी, झाडांचा पहिला वाढदिवस हा आपण व आपला नातू अशा दोघांनीच साजरा केला होता; पण चार वर्षांत त्याला लोकसोहळ्याचे रूप आलेले बघून आपण भारावून गेलो आहोत, असे सांगितले.

सर्व झाडांचे संगोपन करणाºया चैतन्य योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांचा वटवृक्षांची प्रतिमा देऊन यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी मेजर महादेव सन्मुख, विनोद परमेकर, राजू माने यांच्या बगीचातील उल्लेखनीय कामांबद्दल तसेच शिवाजी पाटील, हेमंत लोखंडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, प्रा. मोहन मतकर व सावली ग्रुप यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायक शिवाजीराव पटवणे यांच्या गीतगायनाने झाली. या कामी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे सहकार्य लाभले. यावेळी दिग्दर्शक यशवंत भालकर, अनिल देशपांडे, अशोकराव चौगले, रामराव दळवी, भगवानराव पोवार, अरविंद पाटील, डी. बी. पाटील, उद्धव जाधव व ए. के. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. डी. बी. पाटील यांनी आभार मानले.

झाड वाढदिवसकोल्हापुरात रविवारी जुना वाशी नाका येथील रंकाळा उद्यानात निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी यांच्यातर्फे झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी केक कापून झाडांचा वाढदिवस केला. 

 

टॅग्स :Socialसामाजिकkolhapurकोल्हापूर