शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:33 IST

देशात, राज्यात होणारे अतिरेकी हल्ले, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर विशेषत: इचलकरंजी शहराची सुरक्षा धोक्याची बनली आहे. औद्योगीकरणाचे वाढते जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यांपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देइचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणारतज्ज्ञांकडून सर्व्हे : चौकात, संवेदनशील ठिकाणी ३५ कॅमेरे बसणार

कोल्हापूर : देशात, राज्यात होणारे अतिरेकी हल्ले, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर विशेषत: इचलकरंजी शहराची सुरक्षा धोक्याची बनली आहे. औद्योगीकरणाचे वाढते जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यांपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

तज्ज्ञांनी केलेल्या सर्व्हेनुसार चौकासह संवेदनशील ठिकाणी ३५ अत्याधुनिक कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यासाठी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकृत पुरवठादार, उत्पादक व नामांकित पुरवठादार तसेच स्थानिक विविध प्रमाणित कंपन्यांकडून ई-निविदा मागविली आहे.कोल्हापूर शहरापाठोपाठ इचलकरंजी येथील गुन्हेगारीचा आलेख दरवर्षी चढता आहे. भरदिवसा लूटमार करून, मोटारीच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू गायब केल्या जातात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वृद्ध महिला व पुरुषांना तर चेनस्नॅचरनी लक्ष्यच केले आहे. घरफोड्या, हत्यारांची तस्करी, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शहरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे.

कोल्हापुरात सुमारे साडेसहा कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचा फायदा येथील पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी होत आहे. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आली आहे.

दि. १७ ते ३० जुलैपर्यंत संकेतस्थळावर आॅनलाईन निविदा अपलोड करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर ३१ जुलै रोजी दुपारी एक वाजता निविदाधारकांसमोर ई-निविदा उघडण्यात येणार आहेत. कोणतीही निविदा कारण न देता मंजूर वा नामंजूर करण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक यांनी राखून ठेवला आहे.सीसीटीव्हीचा फायदासीसीटीव्हीमुळे इचलकरंजी शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवता येणार आहे. शहरात आलेले वाहन किती वेळाने बाहेर गेले, तसेच महिन्यातून ते वाहन किती वेळा इचलकरंजीत आले, याची माहिती ठेवणे सहज शक्य होणार आहे. अतिरेकी, दहशतवादी अथवा घुसखोरी करणाऱ्या लोकांचा वावर इचलकरंजीत आहे का? याची माहिती मिळणार आहे; तसेच शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होऊन चोऱ्या, लूटमारीतील संशयित आरोपींना पकडणे सोपे जाणार आहे.

कोल्हापूर शहराच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. इचलकरंजी शहराच्या सुरक्षेसाठी लवकरच कॅमेरे बसविण्यात येतील.- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

 

टॅग्स :cctvसीसीटीव्हीkolhapurकोल्हापूर