शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :मतदार यादीत दोन्हीकडे नाव ठेवल्यास गुन्हा दाखल: विभागीय आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:44 IST

मतदार यादीत दोन्ही ठिकाणी नावे ठेवणाऱ्या मतदारांवर गुन्हा दाखल केला जाईल. अद्याप कुणावरही अशा स्वरूपाची कारवाई केलेली नाही; परंतु यापुढे ती केली जाईल, असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी येथे दिला.

ठळक मुद्देमतदार यादीत दोन्हीकडे नाव ठेवल्यास गुन्हा दाखल: विभागीय आयुक्तांचा इशारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत मतदार याद्यांसदर्भात बैठक

कोल्हापूर : मतदार यादीत दोन्ही ठिकाणी नावे ठेवणाऱ्या मतदारांवर गुन्हा दाखल केला जाईल. अद्याप कुणावरही अशा स्वरूपाची कारवाई केलेली नाही; परंतु यापुढे ती केली जाईल, असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी येथे दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात मतदार याद्यांसदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महपालिका शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरचिटणीस अनिल साळोखे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीप मैत्राणी, कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, ‘मनसे’चे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय करजगार, आदी प्रमुख उपस्थित होते.विजय करजगार यांनी, काही व्यापाऱ्यांची नावे दोन्हीकडे असून ते दोन्हीकडे मतदान करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर डॉ. म्हैसेकर यांनी मतदार यादीत दोन्हीकडे नावे ठेवणे हा गुन्हा असून, संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला.सचिन चव्हाण यांनी कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण मतदार संघांतील नावे मोठ्या संख्येने वगळल्याने संशय निर्माण झाल्याचे सांगून, परस्पर काही लोकांची नावे इतरत्र स्थलांतरित केल्याचे सांगितले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे ही माहिती घेतली, अशी विचारणा केली.

यावर करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी २०१६ च्या मतदार यादी कार्यक्रमानुसार खात्री करूनच ही नावे वगळण्यात आल्याचे सांगितले. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांना कल्पना देण्यात आली असून, ही यादी महापालिका, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालयांमध्ये लावण्यात आलेली आहे. तरीही शंका असल्यास अशी नावे निदर्शनास आणून द्यावीत, बीएलओ जागेवर जाऊन त्यांचे फॉर्म पुन्हा भरून घेतील.डॉ. म्हैसेकर यांनी वगळण्यात आलेल्या मतदारांना निवडणूक विभागाकडून नोटीस पाठवून त्यांना याबाबत कळवावे, अशा सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्या. शारंगधर देशमुख यांनी बीएलओ काही ठिकाणी जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर डॉ. म्हैसेकर यांनी बीएलओंची बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्या माध्यमातून आढावा घेतला जाईल व कामचुकार बीएलओंवर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, अजित फराकटे, आदी उपस्थित होते.

नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करावीमतदार यादीचा आढावा घेता, अजूनही काही कालावधी शिल्लक असून, या काळात निवडणूक विभागाने जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करावी, यामध्ये राजकीय पक्षांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

राजकीय पक्षांनी मतदार केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावामतदार यादी कार्यक्रमांतर्गत सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावा; जेणेकरून निवडणूक विभागाच्या कामकाजाबाबत त्यांना योग्य ती माहिती मिळेल, असे आवाहन स्नेहल भोसले यांनी केले. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त