शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कसबा बावड्यातील कचऱ्याचा ‘कॅपिंग’ प्रस्ताव, महासभेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:20 IST

कसबा बावड्यातील कचऱ्यांचा डोंगर आणि शिये येथील खणीचा प्रश्न यावर दिलीप पोवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर कसबा बावड्यातील कचरा आता उचलणे शक्य नसून, त्या ठिकाणी ‘कॅपिंग’चा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तीन महिन्यांत कचऱ्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देकसबा बावड्यातील कचऱ्याचा ‘कॅपिंग’ प्रस्ताव, महासभेत माहितीतीन महिन्यांत प्रश्न निकाली काढण्याचे आयुक्तांचे आश्वासन

कोल्हापूर : कसबा बावड्यातील कचऱ्यांचा डोंगर आणि शिये येथील खणीचा प्रश्न यावर दिलीप पोवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर कसबा बावड्यातील कचरा आता उचलणे शक्य नसून, त्या ठिकाणी ‘कॅपिंग’चा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तीन महिन्यांत कचऱ्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील कचरा उठाव, त्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या याबाबत मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांना धारेवर धरले. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांवर आयुक्त डॉ. चौधरी यांनी खुलासा केला.शहरातील कचरा उठावाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न अशोक जाधव यांनी विचारला. त्यावर आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, कसबा बावडा येथे सुमारे साडेचार लाख टन कचरा शिल्लक आहे.

तो दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे; पण तो खर्च महापालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे तो कचऱ्याचा डोंगर त्याच ठिकाणी मुरवून तेथे बगीचा करण्याचा ‘कॅपिंग’चा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल.

त्यानंतर हा कचऱ्याचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कसबा बावड्यात कचऱ्याच्या नवीन प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असल्याचे अशोक जाधव यांनी सांगितले.

साडेआठ कोटींचा ‘टीडीआर’कचऱ्याच्या प्रश्नावर भूपाल शेटे यांनी, तावडे हॉटेल परिसरात कचऱ्याच्या आरक्षित जागेसाठी सुमारे साडेआठ कोटींचा ‘टीडीआर’ दिलेला आहे. मग ती आरक्षित जागा आपल्या हक्काची असताना त्या जागेत कचरा का टाकत नाही, असा प्रश्न आयुक्त डॉ. चौधरी यांना विचारला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर