शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:45 IST

परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग करून चित्रपटगृहाची इमारत पाडल्याबद्दल जुन्या पुणे-बंगलोर रोडवरील संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केली आहे. चित्रपटगृहमालकांना ५ हजार रुपयांचा दंड ही करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई परवान्याच्या अटी, शर्तींचा भंग, चित्रपटगृहचालकांना ५ हजारांचा दंड :

कोल्हापूर : परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग करून चित्रपटगृहाची इमारत पाडल्याबद्दल जुन्या पुणे-बंगलोर रोडवरील संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केली आहे. चित्रपटगृहमालकांना ५ हजार रुपयांचा दंड ही करण्यात आला आहे.संगम चित्रपटगृहाचे मालक सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता चित्रपटगृहाचे बांधकाम पाडल्याबद्दल भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश पोवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि. २८ नोव्हेंबर २०१६ ला संबंधित मालकांकडून खुलाशाची मागणी केली होती. त्यावर त्यांनी चित्रपटगृह चालविणे अशक्य असल्याने दि. १ एप्रिल २०१५पासून खेळ व व्यवसाय बंद केल्याचे कळविले.

सध्या इमारतीची देखभाल होत नाही. त्याचबरोबर काही महिन्यांपासून ही इमारत धोकादायक स्थितीत असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी झाली आहे. अशातच बेकायदेशीर व अनैतिक कृत्ये या ठिकाणी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

या जागी पुन्हा नव्याने काही करायचे झाल्यास कायद्याच्या सर्व बाबींची पूर्तता करून सर्व आवश्यक परवानग्या रितसर घेतल्या जातील, असे या खुलाशाद्वारे मालक बुदिहाळकर-पाटील यांनी कळविले होते.यावर वस्तुस्थिती पाहता महाराष्ट्र चित्रपटगृहे नियम १९६६ मधील तरतुदीनुसार मंजूर करण्यात आलेल्या परवानगींच्या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे तसेच इमारत पाडून ही जागा इतर व्यक्तीस हस्तांतर केल्यामुळे मुंबई सिनेमा (विनिमय) अधिनियम १९५३ च्या ‘कलम ७’मधील तरतुदीनुसार चित्रपटगृह मालक बुदिहाळकर-पाटील यांना ५००० रुपये दंडाची कारवाई अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

कार्यालयाच्या परवानगीशिवाय मालकांनी त्याचा पुनर्विकास करू नये, असे आदेश दिले आहेत. याबाबतची नोंद प्रॉपर्टीकार्डच्या ‘इतर हक्कांत’ करण्याचे आदेशही नगर भूमापन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

 

यासंदर्भातील आदेश आपल्याला मिळाले आहेत. आपल्याला व्यवसाय परवडत नसल्याने आपण सन २००१ मध्येच हे चित्रपटगृह बंद करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितली होती. त्यानंतर काही काळ पत्रव्यवहार व सुनावणी झाली; परंतु १२ वर्षांत काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ही इमारत धोकादायक झाल्याने ती पाडली तसेच रिकाम्या जागेची कायदेशीररीत्या विक्री केली आहे, तरीही माझ्याकडून काही चूक झाले असे वाटत असल्यास आदेशाप्रमाणे दंड भरणार आहे. त्यावर आपला काहीच हरकत नाही.- सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार