शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  ‘बीएलओ’चा आदेश रद्द करा : मुख्याध्यापक संघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:07 IST

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभासद असलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत. हे आदेश रद्द करावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने केली.

ठळक मुद्दे ‘बीएलओ’चा आदेश रद्द करा : मुख्याध्यापक संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभासद असलेल्या शाळेतील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत. हे आदेश रद्द करावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली.निवेदनात म्हटले आहे की, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’ नियुक्तीचे आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये फौजदारी कारवाईचा इशारा असल्याने मुख्याध्यापकांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्याला तो लागू केला आहे.

फौजदारी कारवाईची भीती दाखवून संबंधित कर्मचाऱ्याला ‘बीएलओ’च्या कामावर हजर होण्याची सक्ती केली जात आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम आदेशानुसार मुख्याध्यापक संघाच्या सभासद असणाऱ्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास दिलेले ‘बीएलओ’चे नियुक्ती आदेश स्थगित करण्यात आले आहे.

२००५ पासून शिक्षकेतर कर्मचारी व मे २०१२ पासून शिक्षक भरती बंद असल्याने उपलब्ध शिक्षक व कर्मचारी यांना घेऊन शाळेचे काम करणे अवघड झाले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांचे ‘बीएलओ’चे आदेश रद्द करण्यात यावेत.शिष्टमंडळात अध्यक्ष सुरेश संकपाळ, ‘टीडीएफ’चे अध्यक्ष राजेश वरक, दादा लाड, एस. डी. लाड, दत्ता पाटील, बी. आर. बुगडे, ए. एम. पाटील, एस. एम. पसाले, एन. एच. गाडेकर, जयंत आसगांवकर, मिलिंद पांगिरेकर, वसंतराव देशमुख, एस. एम. गायकवाड, उदय पाटील, बाबासो पाटील, बाळ डेळेकर, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर