शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मोजकी गावे घेऊनच कोल्हापूरची हद्दवाढ, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:49 IST

सणावाराच्या दिवसात आंदोलन करून वेळ घालवू नका

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा माझा प्लॅन वेगळा आहे. शहरालगतची काही गावे आज शहरात समाविष्ट झाल्यासारखी आहेत. या गावांना घेऊनच हद्दवाढ करण्याचा आपला प्रयत्न राहील. प्रस्तावात समाविष्ट असणारी काही गावे, दोन औद्योगिक वसाहती मागणार नाही. काही मोजकी गावे घेऊन हद्दवाढ करायची आहे. त्यामुळे ज्या गावाबाबत वादच नाही त्यांनी विनाकारण आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.महापालिकेतील आढावा बैठकीसाठी मुश्रीफ आले होते. त्यांना हद्दवाढीबद्दल विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली. मी आज या विषयावर बोलणार नव्हतो. हद्दवाढीचा माझा प्लॅन वेगळा आहे, काही मोजकी गावेच घेऊन हद्दवाढ करायची आहे. त्यामुळे अठरा गावे, दोन औद्योगिक वसाहतीमधील ग्रामस्त, पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करणे उचित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.महापालिकेतील आढावा बैठकीत २१ विषयांवर चर्चा झाली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या विकासकामांचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन मुश्रीफ यांना दाखविण्यात आले. मुश्रीफ यांचे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आले. रांगोळ्या, फुलांच्या माळांनी दरवाजे सजविण्यात आले होते. विविध संघटनांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आश्वासनांचा धडाका...

  • शहरातील २२० एमएलडी सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण मार्च २०२४ पर्यंत शंभर टक्के रोखणार.
  • शहरात कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, योग्य प्रक्रिया केली जाईल. टिपर घेण्यासाठी निधी देणार.
  • ७९ कोटींच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरित रक्कम मार्चपर्यंत देणार.
  • सध्याच्या बहुमजली पार्किंग जागेत भक्तनिवास बांधणार, बदल प्रस्ताव देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना.
  • शहराचे सुशोभीकरण, फुले रुग्णालयातील सुविधा सीएसआर फंडातून उपलब्ध करून देणार.
  • महापालिकेच्या आरक्षित जागा मोकळ्या करून घेऊन तेथे ६९ आपले दवाखाने सुरू करणार.
  • केएमटीकडे १०० ई बसेस घेण्यासाठी केंद्रीय शहरी वाहतूक मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार.
  • केएमटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना.
  • बाबुभाई परिख पुलाजवळ पादचारी उड्डाणपुलाला ३ कोटी ८८ लाखांचा निधी देणार.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ