शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख पुस्तकांमधून : उमेशचंद्र मोरे, ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:54 IST

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘ पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत ...

ठळक मुद्देवाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत बालचमूंची उपस्थिती

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील होते.मोरे म्हणाले, वयाच्या दहाव्या वर्षी मुले खुनासारखे गुन्हे करीत आहेत. कायद्याचे परिणाम त्यांना माहिती नसतात. यासाठी स्त्रीभ्रूण हत्या, आरटीओ नियम, रॅगिंग कायदा, वाहतुकीचे नियम न पाळल्यास काय होऊ शकते याची माहिती होण्यासाठी ‘विधि वाचनकट्टा’ सुरूकरा, यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, न्यू कॉलेजचे उपप्राचार्य टी. के. सलगर, दिनेश प्रभू, डॉ. शशिकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस. वाय. कदम, वनिता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुस्तकाचे लेखक युवराज कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाचनकट्ट्याच्या कार्यकारी सदस्या भाग्यश्री शिंदे यांनी आभार मानले, तर वैदेही जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

बालचमूंची बालसभाडोंबाऱ्यांचा खेळ करणारी चिंधी, टागोरांच्या कथा, विनूची आई, वीरांच्या कथा, गुणवान सिक्रेट अशा छोट्या कथांनी मनावर व विचारांवर संस्कार केल्याचे विवेचन शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत गायत्री पाटील, श्रृती राऊत, विराज तलवार, साक्षी मालेकर, अन्शुल टेंबे, मिरासाहेब जमादार, संध्या काटकर, आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य