शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंध व्यक्तींनी ब्रेल भाषा आत्मसात केली पाहिजे : अंजली निगवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 18:06 IST

लुई ब्रेल यांनी संशोधन केलेली बिंदू स्पर्श भाषा ही दृष्टिबाधितांसाठी वरदान ठरली आहे. संगणकीय युगात ही ब्रेल भाषा आत्मसात करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन डॉ. अंजली निगवेकर यांनी पारितोषिक वितरण समारंभात केले. अध्यक्षस्थानी डॉ. चेतन खारकांडे होते.

ठळक मुद्देअंध व्यक्तींनी ब्रेल भाषा आत्मसात केली पाहिजे : अंजली निगवेकरसक्षमच्या ब्रेल लेखन-वाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरणलांडगे, पुंजारा, दाशाळ, हजाम विजेते

कोल्हापूर : लुई ब्रेल यांनी संशोधन केलेली बिंदू स्पर्श भाषा ही दृष्टिबाधितांसाठी वरदान ठरली आहे. संगणकीय युगात ही ब्रेल भाषा आत्मसात करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन डॉ. अंजली निगवेकर यांनी पारितोषिक वितरण समारंभात केले. अध्यक्षस्थानी डॉ. चेतन खारकांडे होते.यावेळी सक्षम संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ब्रेल लेखन आणि वाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण येथील नूतन मराठी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. निगवेकर आणि डॉ. चेतन खारकांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. निगवेकर बोलत होत्या.प्रास्ताविकात सक्षमचे अध्यक्ष गिरीश करडे यांनी लुई ब्रेल यांचा संपूर्ण जीवनपट सांगितला. मोठ्या गटात गोखले कॉलेजच्या विशाखा लांडगे हिने वाचन स्पर्धेत, तर गोखले कॉलेजच्याच पूनम पुंजारा हिने लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. लहान गटात विद्यापीठ हायस्कूलच्या सुशांत दाशाळ याने वाचन स्पर्धेत, तर विद्यापीठ हायस्कूलच्याच वैष्णवी हजाम हिने लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचा निकाल सारिका करडे यांनी जाहिर केला. सूत्रसंचालन भक्ती करकरे यांनी केले, तर विनोद ओसवाल यांनी आभार मानले.यावेळी डॉ. अंजली निगवेकर यांचा शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुखपदी पदोन्नती झाल्याबद्दल डॉ. चेतन खारकांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सक्षमच्या उपाध्यक्षा डॉ. शुभांगी खारकांडे यांनी सर्वांना तिळगूळ देऊन मकर संक्रमणाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. यावेळी वसंत सुतार,अजय वणकुद्रे उपस्थित होते.ब्रेल लेखन - वाचन स्पर्धेचा निकाललहान गट (इयत्ता पाचवी ते आठवी)ब्रेल लेखन : सुशांत दाशाळ (द्वितीय) आणि नेताजी काणेकर (तृतीय).ब्रेल वाचन : मुकुंद गिणगिणे (द्वितीय) आणि कान्होपात्रा शेंबडे (तृतीय).मोठा गट (इयत्ता नववी ते बारावी)ब्रेल लेखन : अतुल भगत (द्वितीय), सविता चौधरी (तृतीय).ब्रेल वाचन : भिकाजी लोकरे(द्वितीय), रोहन लाखे (तृतीय).

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर