शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडीत शनिवारपासून दत्त जन्मकाळ सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 1:13 PM

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव प्राचार्य गुंडो पुजारी यांनी दिली.

ठळक मुद्देनृसिंहवाडीत शनिवारपासून दत्त जन्मकाळ सोहळाविकास पुजारी, गुंडो पुजारी यांची माहिती

कोल्हापूर /नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव प्राचार्य गुंडो पुजारी यांनी दिली.येथील दत्तजयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आदी राज्यांतून अनेक भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. भाविकांना दर्शनाची सोय व्हावी, यासाठी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानमार्फत अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.दत्तजयंतीनिमित्त दत्त मंदिरात काकड आरती व शोड्षोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, श्रींच्या चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद तसेच येथील ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल. यानंतर श्री नारायणस्वामी महाराजांच्या मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल. त्यानंतर ह. भ. प. मकरंदबुवा देवरस यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.

जन्माकाळानंतर पारंपरिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटण्यात येणार आहे. रात्री नऊनंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होऊन रात्री उशिरा शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी राजू ऊर्फ विष्णू पुजारी यांच्या लक्ष्मी निवास येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

श्री दत्तजयंती उत्सवकाळात दर्शनरांग व्यवस्था, मुखदर्शन, क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, महाप्रसाद, कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई, आदी आवश्यक सोयी-सुविधा दत्त देवसंस्थानमार्फत करण्यात आली आहे.

जादा एस. टी. बसेस सोडण्यासाठी राज्य परिवहन मंडळ व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव प्राचार्य गुंडो पुजारी यांनी दिली. यावेळी विश्वस्त अशोक पुजारी, रामकृष्ण पुजारी, गोपाळ पुजारी, अमोल विभूते, महेश हावळे, मेघ:शाम पुजारी, आशिष पुजारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरkolhapurकोल्हापूर