शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची उसळी, क्विंटलला ४६०० रुपये उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 14:46 IST

कांद्याच्या दरातील वाढ सुरूच असून, गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत निघालेल्या सौद्यांत क्विंटलला चार हजार ६०० रुपये उच्चांकी दर मिळाला. कांद्याने घेतलेली ही उसळी गेल्या वर्षभराच्या हंगामातील सर्वांत मोठी ठरली असून, एका दिवसात दरात एका क्विंटलला ८०० रुपयांची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर बाजार समितीत कांद्याची उसळीक्विंटलला ४६०० रुपये उच्चांकी दर

कोल्हापूर : कांद्याच्या दरातील वाढ सुरूच असून, गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत निघालेल्या सौद्यांत क्विंटलला चार हजार ६०० रुपये उच्चांकी दर मिळाला. कांद्याने घेतलेली ही उसळी गेल्या वर्षभराच्या हंगामातील सर्वांत मोठी ठरली असून, एका दिवसात दरात एका क्विंटलला ८०० रुपयांची वाढ झाली आहे.जीवनावश्यक गटात मोडणारा कांदा निवडणूक काळात नेहमीच केंद्रस्थानी येतो. १० वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून कांदा आणि निवडणुका हातात हात घालूनच येत आहे. आताही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होत असताना कांद्याच्या दरानेही जोरदार उसळी घेतली आहे.

महापूर आणि कोरडा दुष्काळ यांमुळे खरीप कांद्याचे पीक खराब झाल्याने कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे, असे म्हटले जात असले तरी ऐन निवडणुकीत मतदारांना रडविण्याची जबाबदारी कांद्याने उचलली आहे.राज्यभरात गुरुवारी निघालेल्या सौद्यांत किलोचा किमान दर ४० रुपये राहिला आहे. कोल्हापूर ही तशी कांद्याची बाजारपेठ नसली तरी श्रीगोंदा, नाशिक, पुणे, नगरमधून कोल्हापुरात कांद्याची आवक होते. दर चांगले मिळत असल्याने व्यापारी प्राधान्य देत असल्याचे दिसते.

गुरुवारी सकाळी समितीत निघालेल्या सौद्यावेळी १० किलोंचा दर ४६० रुपये निघाला आहे. किमान भाव ३४० रुपये राहिला. बुधवारी निघालेल्या सौद्याला हाच दर सर्वाधिक ३८० असा होता; तर किमान २८० रुपये प्रति १० किलो दर होता. एकाच दिवसात किलोमागे आठ, तर १० किलोेंमागे ८०० रुपयांची वाढ झाली आहे.आवक निम्म्यावरखरिपातील कांदा कुजल्यामुळे मुळातच बाजारात आवक कमी झाली आहे. चाळीतील साठवणुकीच्या कांद्यावरच पुरवठा व्यवस्थापन सांभाळले जात आहे. त्यामुळे सौद्यासाठी कांदे भरून येणाऱ्या ट्रकचीही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. कोल्हापुरात ४० ते ५० ट्रकऐवजी २० च ट्रक आले. त्यातून अवघी ३११० पोतीच कांद्याची आवक झाली. 

 

टॅग्स :onionकांदाkolhapurकोल्हापूर