शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

कोल्हापूर : डास निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवा : शौमिका महाडिक, प्रत्येक गुरुवार ‘डास संहारक दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:17 IST

कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी दर गुरुवार हा डास संहारक दिन पाळून गाव, गल्ली स्वच्छ करणे तसेच डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबरच गुरुवार कोरडा दिवस पाळून आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी येथे दिले.

ठळक मुद्देडास निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवा : शौमिका महाडिक प्रत्येक गुरुवार ‘डास संहारक दिन’

कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी दर गुरुवार हा डास संहारक दिन पाळून गाव, गल्ली स्वच्छ करणे तसेच डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबरच गुरुवार कोरडा दिवस पाळून आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी  येथे दिले.जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आयोजित जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती आरोग्य सभापती सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सहायक आरोग्याधिकारी डॉ. मनीषा कुंभार, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे, आदींची होती.यावेळी एकात्मिक डास निर्मूलन मोहिमेचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते झाले. महाडिक म्हणाल्या, जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादूर्भाव डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेने डेंग्यू प्रतिबंधासाठी गाव घटक धरून नियोजन केले आहे.

गाव पातळीवर डेंग्यू प्रतिबंधासाठी समिती स्थापन केली असून, गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या सक्रिय योगदानातून डास प्रतिबंधक मोहीम अधिक तीव्र केली जात आहे.सर्जेराव पाटील यांनी, एकात्मिक डास निर्मूलन मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. स्वच्छता, दक्षता याबरोबरच आरोग्य शिक्षण या बाबींना प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगून गावातील पाण्याच्या टाक्या महिन्यातून एकदा स्वच्छ करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.डॉ. खेमनार म्हणाले, डास निर्मूलनासाठी जिल्ह्यात डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा प्रभावी कार्यक्रम हाती घेतला असून, जिल्ह्यात ४२० गप्पी माशांची पैदास केंद्रे कार्यान्वित केली आहेत.

मोहिमेचा दर आठवड्याला आढावाएकात्मिक डास निर्मूलन मोहिमेस सर्व यंत्रणांनी सक्रिय योगदान द्यावे, परस्पर समन्वय राखून ही मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश देऊन जिल्हा स्तरावर डास संहारक टीम कार्यान्वित केली असून या मोहिमेचा दर आठवड्याला आढावा घेऊन तिला गती दिली जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर