शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  पाटाकडील ‘ब ’ - दिलबहार ‘ब’ यांच्यातील लढत बरोबरीत, के.एस.ए.वरिष्ठ गट लीग फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 19:04 IST

के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (ब) व दिलबहार तालीम मंडळ(ब) यांच्यात गुरुवारी झालेला अटीतटीचा सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहीला. दोन्ही संघांना समर्थकांचे पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभल्याने सामन्यांत रंगत वाढली होती.

ठळक मुद्देअटीतटीचा सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत पुर्वार्धात आक्रमक, वेगवान खेळाचे प्रदर्शन

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (ब) व दिलबहार तालीम मंडळ(ब) यांच्यात गुरुवारी झालेला अटीतटीचा सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहीला.शाहू स्टेडियमवर पाटाकडील (ब) व दिलबहार (ब) या दोन पारंपारिक संघात तिसऱ्या फेरीत गाठ पडली. यात प्रारंभापासून पाटाकडील(ब)कडून ओंकार देवणे, रोहीत पोवार, समीर पठाण, ऋषिकेश मोरे, सुनीत पाटील, शुभम मोहिते, तर दिलबहार(ब) कडून ओंकार शिंदे, प्रशांत आजरेकर, शंशाक माने, प्रतिक व्हनाळीकर यांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन पुर्वार्धात केले. पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही.पुुर्वार्धात पाटाकडील(ब)कडून ओंकार देवणेच्या पासवर रोहन कांबळेची,तर रोहन कांबळेची समीर पठाणच्या पासवर गोल करण्याची संधी गेली. दिलबहार(ब)कडून प्रशांत आजरेकरच्या पासवर रोहन पाटील, प्रतिक व्हनाळीकरच्या पासवर गोल करण्याची संधी गेली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान चाली रचत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला.

पाटाकडील(ब)कडून ओंकार देवणेचा फटका गोलपोस्टला थडकून बाहेर गेला. तर समीर पठाणची गोल करण्याची नामी संधी गेली. दिलबहार(ब)कडून प्रशांत आजरेकरने डाव्या पायाने मारलेला फटका गोलपोस्टजवळून गेला.

दोन्ही संघांना समर्थकांचे पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभल्याने सामन्यांत रंगत वाढली होती. अखेरपर्यंत दोन्ही संघांना पूर्णवेळेत गोल करता न आल्याने सामना अखेर गोलशून्य बरोबरीत राहीला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला.सामनेदु. २ वा. साईनाथ स्पोर्टस विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीमदु. ४ वा. प्रॅक्टिस क्लब(अ) विरुद्ध खंडोबा(अ) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल