शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी उद्या कोल्हापूर बंद, सकल मराठा समाजाचा निर्णय

By समीर देशपांडे | Updated: September 4, 2023 13:27 IST

‘जवाब दो, जवाब दो, महाराष्ट्र सरकार जवाब दो’

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उद्या मंगळवारी कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने दसरा चौकात दुपारी निर्दशने करण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, आदिल फरास, गणी आजरेकर, दिलीप देसाई यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी साडे अकरापासून दसरा चौकात कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली. यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. ‘जवाब दो, जवाब दो, महाराष्ट्र सरकार जवाब दो’, ‘चुकता होणार, चुकता होणार, हिशोब आता चुकता होणार’,‘एक मराठा, लाख मराठा’,‘या जनरल डायरचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला. यानंतर निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी या आंदोलनामागील भूमिका सांगितली. अमानूष लाठीचार्ज करणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक अन् उपअधीक्षक यांना निलंबित करा, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उद्या, मंगळवारी कोल्हापूर शहर बंदचे आवाहन केले. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस