शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बाबूजमाल उरुसाला संदलने उत्साहात सुरुवात: आज गलेफ मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 15:53 IST

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) दर्गाह शरीफ यांचा उरुसाला संदल (गंध) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमाने सोमवारपासून सुरुवात झाली. विद्युत रोषणाईने सजविलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

ठळक मुद्देबाबूजमाल उरुसाला संदलने उत्साहात सुरुवात आज गलेफ मिरवणूक

कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) दर्गाह शरीफ यांचा उरुसाला संदल (गंध) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमाने सोमवारपासून सुरुवात झाली. विद्युत रोषणाईने सजविलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.रात्री सव्वा दहा वाजता पारंपरिक पद्धतीने बँडच्या गजरात संदल (गंध) लावण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी दर्ग्यातील मजारांना चंदन लावण्यात आले. मुख्य खादीम लियाकत मुजावर, एनुद्दीन मुल्ला, शकील मुतवल्ली, अल्ताफ मुतवल्ली, इम्तियाज मुतवल्ली, दिलावर मुजावर, शाहरूख गडवाले यांनी संदल लावला.

यावेळी संदल लावण्याबरोबरच फतिहा व दुवा करण्यासाठी हिंदू-मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज, मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता बाबूजमाल येथून गलेफ मिरवणूक निघणार आहे.

यावेळी येथील गावकामगार पाटील यांचे घराला भेट देऊन गुजरी, जुना राजवाडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या गादीच्या ठिकाणी फतिहा पठण होऊन मिरवणूक पुन्हा बाबूजमाल दर्गाह येथे परतणार आहे. मिरवणुकीनंतर बाबूजमाल दर्गाह शरीफ येथे गलेफ पाठविण्याचा कार्यक्रम होणार आहे.

 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर