शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

कोल्हापूर : बुध्दीभेद करून काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न : अ‍ॅड. उज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:03 IST

विचारांची फुट पडून, बुध्दीभेद करून काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनक्षली भागातील नागरिकांसाठी ट्रकभर कपडे, शाहुपूरी पोलीसांचा वेगळा आदर्शअ‍ॅड. उज्वल निकम यांनी केले कौतुक

कोल्हापूर : आज देशामध्ये प्रामुखाने दोन महत्वाच्या समस्या आहेत. दहशतवाद आणि नक्षलवाद, परंतू नक्षलवादाचे लोण शहरी भागात पसरले आहे. म्हणूनच विचारांची फुट पडून, बुध्दीभेद करून काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला जर पायबंद घालायचा असेल तर नक्षलवादी भागातील लोकांना आम्ही तुमच्याकरीता आहोत, तुम्ही आमचे आहात ही भावना वाढीला लावणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रगतीची सुरुवात शाहुपूरी पोलीसांनी केली आहे, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त  केले.

शाहुपूरी पोलीस ठाणे आणि व्हिजन ट्रस्ट अक्षय मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांना ट्रक भरुन कपडे पाठविण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अ‍ॅड. निकम व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे हस्ते झेंडा दाखवून ट्रक गडचिरोलीकडे रवाना झाला.

यावेळी अ‍ॅड. निकम म्हणाले, गडचिरोली भागातील नक्षलग्रस्त लोकांना कपड्यांची नितांत गरज आहे. हे पाहूनच शाहुपूरी पोलीस आज कपड्यांनी भरलेला ट्रक पाठवित आहेत. समाजापुढे त्यांनी एक वेगळा आदर्श दाखविला आहे. पोलीस म्हणजे फक्त कायदा व सुव्यवस्था नाही, तर लोकउपयोगी सेवा करु शकतो हे त्यांनी दाखविले आहे.नक्षलवाद आणि दहशतवाद का निर्माण होतो. आज शहरी भागात नक्षलवाद होवू घातला आहे. त्यामुळे बुध्दीभेद करणे हे काही लोकांचे काम होवून बसले आहे. अशावेळी पोलीसांकडून आपण अपेक्षा करतो. पोलीसांनी समाजापुढे चांगला आरसा दाखविला, तर समाज देखील तुमचं चांगलं प्रतिबिंब आरशात बघेल. त्यांनी चांगलं प्रतिबिंब असलेला आरसा बाळगण ही आज काळाची गरज असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. या उपक्रमातील ३५ सहभागी मंडळ, व्यक्तिंना अ‍ॅड. निकम यांचे हस्ते यावेळी सन्मानपत्र देण्यात आली. प्रस्ताविक शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी केले.

आभार संताजी घोरपडे यांनी मानले. कार्यक्रमास राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, महापालिका स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ प्राज्ञापुरीचे अध्यक्ष एन. आर. बुधले आदींसह नागरिक उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमkolhapurकोल्हापूर