शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वर्षभरात २९० अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:07 IST

अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात २९० बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देवर्षभरात २९० अल्पवयीन मुलींवर अत्याचारपाच जिल्ह्यांतील स्थिती : वाढत्या घटना सुन्न करणाऱ्या

एकनाथ पाटील

कोल्हापूर : अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात २९० बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जम्मू-काश्मीर येथील कथुआ येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने देश हादरून गेला म्हणून बारा वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस मृत्युदंड देण्याचा वटहुकूम राष्ट्रपतींनी जारी केला आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या किती घटना घडल्या याची माहिती ‘लोकमत’ ने जाणून घेतली असता धक्कादायक आकडेवारी पुढे आली.वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्तीमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत.

परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत कोवळ्या तीन ते चौदा वर्षांपर्यंतच्या २९० बालिकांवरही खाऊचे आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याच्या आणि बलात्काराच्या घडना घडल्या आहेत. ही गुन्हेगारांची विकृती रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.युवती-महिलांवरील अत्याचारयुवती-महिलांना लग्नाचे, नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून शेवटी लग्नास किंवा नोकरी लावण्यास नकार दिल्याप्रकरणीही परिक्षेत्रात ६०० बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत; तर विनयभंगाचे १८२९ गुन्हे दाखल आहेत.

जिल्हानिहाय चित्र (अल्पवयीन मुलींवरील अत्याचार)

  1. कोल्हापूर : ५५
  2. सांगली : ३८
  3. सातारा : ४८
  4. सोलापूर ग्रामीण : ६०
  5. पुणे ग्रामीण : ८९

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पोलीस तपास व्यवस्थित करीत नाहीत. कायद्यातील बदलांची माहिती पोलिसांना नसते; त्यामुळे आरोपी निर्दोष सुटत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढत आहे. हे रोखण्यासाठी कायद्यातील बदलांची माहिती देण्यासाठी पोलिसांची कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. आरोपी कोण, हे पाहण्यापेक्षा अत्याचारी मुलींना न्याय मिळवून देण्याची मानसिकता ठेवली तर अशा घटनांना चाप बसेल.- अ‍ॅड. शिवाजीराव राणे,ज्येष्ठ विधिज्ञ, कोल्हापूर

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा