शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कोल्हापूर :प्राचार्यास धक्काबुक्की करणाऱ्या फरार संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:39 IST

कोल्हापूर : येथील राजाराम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य वसंत बाबूराव हेळवी (वय ५४) यांना कॉलेजमध्ये घुसून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्या संशयितास मुंबई येथे पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित ऋषिकेश मोहन गाडगीळ (वय ४०, रा. टिंबर मार्केट) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, राजाराम कॉलेजमध्ये एका महिला प्राध्यापकाचा कॉलेज प्रशासनाबरोबर वाद होता. त्यासाठी ...

ठळक मुद्देप्राचार्यास धक्काबुक्की करणाऱ्या फरार संशयितास अटकन्यायालयाच्या आवारातून घेतले ताब्यात

कोल्हापूर : येथील राजाराम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य वसंत बाबूराव हेळवी (वय ५४) यांना कॉलेजमध्ये घुसून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्या संशयितास मुंबई येथे पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित ऋषिकेश मोहन गाडगीळ (वय ४०, रा. टिंबर मार्केट) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, राजाराम कॉलेजमध्ये एका महिला प्राध्यापकाचा कॉलेज प्रशासनाबरोबर वाद होता. त्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी एप्रिल २०१६ मध्ये संशयित गाडगीळ कॉलेजमध्ये गेला होता. प्रतीक्षा कक्षामध्ये न थांबता तो थेट प्राचार्य वसंत हेळवी यांच्या कार्यालयात घुसला.

हेळवी यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगताच त्याने अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. यावेळी ‘तू कॉलेजच्या बाहेर ये, तुला सोडत नाही’ अशी धमकी देऊन तो निघूून गेला होता. हेळवी यांनी याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दिली होती.

गुन्हा दाखल झाल्यापासून अनेकवेळा पोलिसांनी गाडगीळचा शोध घेतला, मात्र तो मिळून येत नव्हता. तो मुंबईत न्यायालयीन कामकाजासाठी गेला असल्याचे राजारामपुरी पोलिसांना समजले. त्यांनी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पवार यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. पवार यांनी त्याला न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतले. त्याला आणण्यासाठी राजारामपुरीचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर