शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाळा खोल्या पाडण्याला सीईओंचा चाप, १५ प्रस्ताव थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 10:42 IST

ऊठसूठ शाळा खोल्या पाडण्याला (निर्लेखित करण्याला) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चाप लावला आहे. खोल्या पाडण्याचे १५ प्रस्ताव त्यांनी थांबविले असून, या खोल्या दुरूस्त होतात का, याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा स्पष्ट अभिप्राय घ्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाला केल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर : शाळा खोल्या पाडण्याला सीईओंचा चाप१५ प्रस्ताव थांबविले, फेर शिफारस घेतली जाणार

कोल्हापूर : ऊठसूठ शाळा खोल्या पाडण्याला (निर्लेखित करण्याला) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चाप लावला आहे. खोल्या पाडण्याचे १५ प्रस्ताव त्यांनी थांबविले असून, या खोल्या दुरूस्त होतात का, याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा स्पष्ट अभिप्राय घ्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाला केल्या आहेत.प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये शाळा खोल्या पाडण्याचे प्रस्ताव मोठ्या संख्येने असतात. शाळा खोली जर धोकादायक झाली असेल, मुलांना बसवण्यायोग्य नसेल तर ती खोली पाडण्याबाबत प्रस्ताव दिला जातो. पंचायत समिती स्तरावरील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता याबाबतचा आपला स्पष्ट अहवाल देतात.यानंतर शिवाजी विद्यापीठ किंवा शासकीय अभियांत्रिकी विभागाकडून या खोल्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यात येते. यानंतर हा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवण्यात येतो. हा अहवाल अंतिम मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठवण्यात येतो. त्यांच्या स्वाक्षरीने अंतिम खोल्या किंवा इमारती पाडण्यायोग्य असल्याचे कळवण्यात येते.यानंतर स्थायी समिती आणि नंतर सर्वसाधारण सभेमध्ये हा इमारत, खोली पाडण्याचा प्रस्ताव मंजूर केला जातो. अमन मित्तल हे शिक्षण विभागाचा आढावा घेताना या प्रस्तावासोबतचे काही फोटो पाहिल्यानंतर त्यांनी केवळ कौले फुटली आहेत, दरवाजे मोडले आहेत. म्हणून पूर्ण खोलीच कशासाठी पाडायची, असा प्रश्न उपस्थित केला.लाखभर निधी खर्च करून जर ती खोली वापरण्यायोग्य होणार असेल तर खोली पाडण्याची गरज नाही, अशी भूमिका मित्तल यांनी घेतली आहे. त्यामुळे हे सर्व प्रस्ताव पुन्हा बांधकाम विभागाकडे पाठवून खरोखरच खोली पाडण्याची गरज आहे का, थोड्या निधीतून खोली वापरण्यायोग्य होऊ शकते, याचा स्वयंस्पष्ट अहवाल घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला मित्तल यांनी दिल्या आहेत.म्हणूनच त्रयस्थ यंत्रणेमार्फत स्ट्रक्चरल आॅडिटसुरुवातीला केवळ पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची शिफारस आली की इमारती, शाळा खोल्या पाडल्या जात होत्या. शासनाकडून निधी वाढवून मिळाला की सुस्थितीत असलेल्या खोल्याही पाडल्या जायच्या. सर्व शिक्षा अभियान कालावधीमध्ये अशा अनेक चांगल्या खोल्याही पाडण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर दबावापोटी अधिकाऱ्यांनी अहवाल देऊ नये म्हणून त्रयस्थ संस्थेमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानंतरही आता अमन मित्तल यांनी घेतलेली ही भूमिका सदस्य कितपत मानतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाkolhapurकोल्हापूर