शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या तिघा खेळाडूंची राज्य क्रिकेट संघात वर्णी

By सचिन भोसले | Updated: January 6, 2024 17:47 IST

कोल्हापूर : तेवीस वर्षाखालील सी.के.नायडू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे, श्रेयस चव्हाण, अभिषेक निषाद या तिघांची महाराष्ट्र राज्य ...

कोल्हापूर : तेवीस वर्षाखालील सी.के.नायडू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे, श्रेयस चव्हाण, अभिषेक निषाद या तिघांची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. तिघेही कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आहेत.ही स्पर्धा ७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळ्या राज्यात खेळविली जाणार आहे. यात महाराष्ट्रासह सौराष्ट्र, पंजाब, झारखंड, आसाम, ओडीसा, छत्तीसगड, त्रिपुरा या आठ संघाचा समावेश आहे. महाराष्ट्राची पहिली लढत पंजाबशी आज, रविवारपासून मोहालीत होणार आहे. तर दुसरा सामना १४ जानेवारीला राजकोट येथे सौराष्ट्रशी, तर तिसरा समाना २१ जानेवारीपासून आसाम बरोबर गहूंजे (पुणे) येथे होणार आहे. चौथा सामना धनबाद येथे झारखंडसोबत होणार आहे. पाचवा सामना ओडीसासोबत छत्रपती संभाजीनगर येथे आणि सहवा सामना त्रिपूराबरोबर छत्रपती संभाजीनगर, सातवा सामना छत्तीसगड सोबत १८ फेब्रुवारीस छत्तासीगड येथे होणार आहे. या सामन्यांमध्ये हे तिघेही राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

अनिकेतने यापुर्वी २०१४ पासून वेगवेगळ्या गटातून राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने कूचबिहार, पश्चिम विभाग२५वर्षाखालील सी.के.नायडू स्पर्धेत राज्याचा उपकर्णधार म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. तर अभिषेकने २०१७-१८ मध्ये चौदावर्षाखालील महाराष्ट्र संघात, त्यानंतर २०२० मध्ये कुचबिहार मध्ये चांगली कामगिरी केले. याच जोरावर त्याची राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी (राष्ट्रीय शिबीर) साठी निवड झाली. तो निवड झालेला पहिलाच कोल्हापूरकर होता. एकोणीस वर्षाखालील विनू मंकड स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती. 

श्रेयस चव्हाण याने २०१९ मध्ये १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघातून राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. याच वर्षी विनू मंकड स्पर्धेसाठी निवड झाली होती. २०२२-२३ मध्ये २३ वर्षाखालील एकदिवसीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची राज्य संघात निवड झाली होती. या निवडी गंहूजे येथे झालेल्या १५ दिवसीय शिबीरातून करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर