शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आशिया गेम्समध्ये कोल्हापूरचा अनिकेत करणार भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व

By सचिन भोसले | Updated: July 29, 2023 17:17 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरीत आणखी एक मानाचा तुरा अनिकेत जाधव याने रोवला. त्याची हँगजहाऊ (चीन) मध्ये २३ सप्टेंबर ते ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्याफुटबॉल पंढरीत आणखी एक मानाचा तुरा अनिकेत जाधव याने रोवला. त्याची हँगजहाऊ (चीन) मध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या आशियाई गेम्स स्पर्धेसाठी आघाडीचा खेळाडू म्हणून भारतीय फुटबॉल संघात निवड झाली. या संघाची घोषणा आज, शनिवारी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.अनिकेतच्या फुटबॉलची कारकीर्द बालेवाडी (पुणे) क्रीडा प्रबोधिनीतून झाली. त्याची फुटबॉल कारकीर्द घडवण्यासाठी जयदीप अंगीरवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. २०१७ साली भारतात झालेल्या १७ वर्षाखालील फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर २०१८ -२०१९ दरम्यान त्याची  इंडियन अर्रोज या व्यावसायिक फुटबॉल संघाकडून निवड झाली.त्यानंतर जमशदपुर ए.एफसी, हैदराबाद एफसी, ईस्ट बेंगॉल, ओडिसा एफसी अशा देशातील नामांकित फुटबॉल संघाकडून व्यावसायिक खेळाडू आणि त्याचबरोबर २०२२ मध्ये बहरीन व बेलारूस येथे झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. आता चीन येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघात आघाडीचा खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे त्याच्या शाहूपुरी पाचव्या गल्ली येथील घरात आणि कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्यावसायिक फुटबॉल लीग स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीमुळे  आज माझी आशिया गेम्स साठी भारतीय फुटबॉल संघाच्या पथकात निवड झाली. ही बाब मला व माझ्या कुटुंबास कोल्हापूरकरांना भूषणावह आहे. मला सातत्याने शाहू छत्रपती,  संभाजीराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे. आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे. - अनिकेत जाधव, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल