शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचा वर्धापनदिन : गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:46 IST

शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. त्यातील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम विद्यापीठाने वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून होणार आहे. विद्यापीठाचा ५६ वा वर्धापनदिन रविवारी (दि. १८) सकाळी पावणेनऊ वाजता साजरा होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्दे गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम वाढलीयावर्षीपासून अंमलबजावणी; शिवाजी विद्यापीठाचा वर्धापनदिन रविवारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. त्यातील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम विद्यापीठाने वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून होणार आहे. विद्यापीठाचा ५६ वा वर्धापनदिन रविवारी (दि. १८) सकाळी पावणेनऊ वाजता साजरा होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे.गेल्या ५५ वर्षांपासून विद्यापीठातर्फे पुरस्कारांचे वितरण केले जाते. आतापर्यंत विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रोख रक्कम एक हजार रुपये होती. त्यामध्ये विद्यापीठाने आता वाढ करून, ती रक्कम पाच हजार इतकी केली आहे.

विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय सेवकांची शैक्षणिक गुणवत्ता संपादन केलेल्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या रकमेतदेखील वाढ करण्यात आली आहे. बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक, प्राचार्या सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणाऱ्या रोख रकमेत वाढ केलेली नाही.

कुलगुरू पी. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थितीयावर्षीच्या वर्धापनदिनासाठी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील प्रमुख उपस्थित असणार आहेत. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सकाळी पावणेनऊ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असणार आहेत. या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण होईल. यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता ध्वजवंदन होणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर