शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता दर्पण’मध्ये अव्वल जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:10 IST

‘स्वच्छता दर्पण’ या स्पर्धेमध्ये भारतामधील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. रविवार (दि. १२) दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही गौरव करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छता दर्पण’मध्ये अव्वल जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरदिल्लीत होणार १२ जानेवारीला जिल्हा परिषदेचा गौरव

कोल्हापूर : ‘स्वच्छता दर्पण’ या स्पर्धेमध्ये भारतामधील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. रविवार (दि. १२) दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही गौरव करण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत वर्ष २0१९-२0 मध्ये स्वच्छता आणि हागणदारीमुक्ती अंतर्गत येणाऱ्या मुद्यांच्या अनुषंगाने ‘स्वच्छता दर्पण २0१९’ ही आॅनलाईन गुणांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या गुणांकन स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा देशातील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. गुणांकनामध्ये देश स्तरावर अव्वल जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविणारा कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील एकमेव जिल्हा आहे.हागणदारीमुक्त झालेल्या आणि हागणदारीमुक्त न झालेल्या राज्यांसाठी स्वतंत्र गुणांकन पद्धती तयार करण्यात आली होती. यामध्ये गाव पातळीवरील अभियान अंतर्गत झालेले काम, जिल्ह्यांच्या विविध कामांतील प्रगतीचे मुद्दे विचारात घेऊन आॅनलाईन प्रणालीवर नोंद करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले आहे; यासाठी १ जून २0१९ ते ३१ डिसेंबर २0१९ पर्यंत आॅनलाईन गुणांकन प्रक्रियेची नोंद घेण्यात आली आहे.स्वच्छता दर्पण गुणांकन पद्धतीमध्ये हागणदारीमुक्त गाव, शौचालय बांधकाम आणि वापर, गावांची पडताळणी, शौचालय बांधकाम जिओ टॅगिंग, आर्थिक प्रगती नोंद करणे, तसेच गावस्तरावरील जनजागृती उपक्रम, श्रमदान, लोकसहभाग आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या घटकांवर आधारित आॅनलाईन गुणांकन प्रणालीवर माहिती भरण्यात आली होती.जिल्हा परिषदेच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. सर्व पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही व इतर सर्व कर्मचारी यांनी घेतलेले कष्ट आणि केलेले नियोजनबद्ध काम यामुळे हे यश मिळाले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान