शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आंबेडकरी पक्ष, संघटनांची बुधवारी कोल्हापूर बंदची हाक, भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:42 IST

भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने करुन या घटनेचा निषेध करत आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. शहरातील बिंदू चौक येथे रास्ता रोको करुन टायर पेटवून सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देरास्ता रोको, निदर्शने करुन निषेध दुचाकी वाहनांची किरकोळ तोडफोड, सरकारविरोधात घोषणाबाजी मिलींद एकबोटे, संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी

कोल्हापूर : भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने करुन या घटनेचा निषेध करत आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

शहरातील बिंदू चौक येथे रास्ता रोको करुन टायर पेटवून सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. तसेच या घटनेस जबाबदार असणाऱ्या संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून काही दुचाकींची तोडफोड करण्यात आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.भीमा-कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेची प्रतिक्रीया मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातही उमटली. दिवसभरात बिंदू चौक, ताराराणी चौक, आंबेवाडी, शिरोली, वसगडे, केर्ले येथे रास्ता रोको करुन या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. त्याचबरोबर दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.दरम्यान टाऊन हॉल उद्यान येथे झालेल्या बैठकीत या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये ताकदीने उतरुन तो यशस्वी करुया असा निर्धार यावेळी नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावkolhapurकोल्हापूर