शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी १ जुलैपासून आंदोलनाचे बिगुल: सुरेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:18 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासह सरकारने जाहीर केलेल्या योजनांची पूर्तता केलेली नाही. त्याच्या निषेधार्थ १ जुलैपासून राज्यभर लढ्याचे बिगुल वाजवत मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे रणशिंग फुंकले.

ठळक मुद्देमराठा क्रांती संघटना स्थापन : आरक्षण, संरक्षण, शिक्षण ही संघटनेची त्रिसूत्री ९ जुलैला पुण्यात ‘रोख-ठोक’ तर ९ आॅगस्टला महामार्ग रोको आंदोलनाची घोषणा 

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह सरकारने जाहीर केलेल्या योजनांची पूर्तता केलेली नाही. त्याच्या निषेधार्थ १ जुलैपासून राज्यभर लढ्याचे बिगुल वाजवत मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे रणशिंग फुंकले. आरक्षण, संरक्षण, शिक्षण या त्रिसूत्रीवर ‘मराठा क्रांती संघटना’ हे राज्यव्यापी व्यासपीठ स्थापन केल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राजर्षी शाहू जयंतीदिनी राज्यव्यापी मराठा क्रांती संघटनेच्या घोषणेसाठी आयोजित मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती राजू सावंत, प्रा. मधुकर पाटील, फत्तेसिंह सावंत, बाबा महाडिक, चंद्रकांत पाटील आदींची होती. यावेळी २३ जिल्ह्यांतील १७ मराठा संघटनांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत मराठा क्रांती संघटनेच्या स्थापनेची घोषणा पाटील यांनी केली.सुरेश पाटील म्हणाले, मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेले नाही, सरकारने जाहीर केलेल्या योजनांमधील तुटपुंज्या योजनाच पूर्ण झाल्या आहेत. मराठा वसतिगृहांचा भत्ता कमी असून प्रत्येक जिल्ह्याला अद्याप वसतिगृहेच मिळालेली नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण, संरक्षण व शिक्षण या त्रिसूत्रीवर संघटना कार्यरत राहणार आहे.

१ जुलैपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा उभारला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जनजागरणही केले जाणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात शिफारशी लागू कराव्यात यासाठी ९ जुलैला पुण्यात मागासवर्गीय आयोग कार्यालय येथे ‘रोखठोक’ आंदोलन केले जाणार आहे.

त्याचबरोबर आरक्षणासाठी ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी राज्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करून महामार्ग रोखले जाणार आहेत. विजयानंद माने यांनी स्वागत केले. चंद्रकांत भराट यांनी प्रास्ताविक केले. भरत पाटील यांनी आभार मानले.कार्यकारिणी अशी...संस्थापक सुरेश पाटील (कोल्हापूर), कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट (औरंगाबाद), उपाध्यक्ष अजित पाटील व सचिव भरत पाटील (कोल्हापूर), खजानिस गोपाळ दळवी (मुंबई), कार्यकारिणी सदस्य किशोर देसाई (कल्याण), विजय पाटील (सातारा), महादेव साळुंखे (सांगली), चंद्रकांत सावंत (ठाणे), सुनीता पाटील व राणी पाटील (कोल्हापूर).सदाभाऊंची अडचण नको म्हणून बाहेररयत क्रांती संघटनेतून का बाहेर पडला, या प्रश्नावर पाटील म्हणाले, काही महिन्यांपूर्वी मराठा संघर्ष समितीतर्फे कोल्हापुरात गोलमेज परिषद घेतली. त्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्याला बोलावून घेत तुम्ही मराठा समाजाचे काम करणार असाल तर सरकारवर वेडे-वाकडे आरोप होऊन मी अडचणीत येईन, असे सांगितले. त्यामुळे त्यांची अडचण नको; म्हणून मी संघटनेतून बाहेर पडलो.मराठा महासंघ, सेवा संघाला टोलामराठा संघटना आमच्याबरोबर असून मराठा महासंघ, मराठा सेवा संघ अशा बोटावर मोजणाऱ्या संघटना आमच्याबरोबर नसल्याचा टोला लगावत त्या स्वतंत्र अस्तित्व ठेवून काम करणार असतील तर आमचा पाठिंबाच राहील, असे पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर