शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भोंदू ज्योतिषाचा पुन्हा ताबा, कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:20 IST

कुंडली पाहण्यास आलेल्या महाविद्यालयीन युवतीला खडीसाखरेतून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ज्योतिषास राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देभोंदू ज्योतिषाचा पुन्हा ताबा, कसून चौकशीदोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : कुंडली पाहण्यास आलेल्या महाविद्यालयीन युवतीला खडीसाखरेतून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ज्योतिषास राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले.संशयित मनोज ऊर्फ बाबा मधुकर नरके (वय ५०, रा. छत्रपती कॉलनी, सागरमाळ-शास्त्रीनगर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून, पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली.

त्याने खडीसाखर कोठून खरेदी केली. गुंगीचे औषध कोठून मिळविले, आणखी किती युवती-महिलांवर अत्याचार केला आहे, यासंबंधीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रविवारी दिली.कुंडली पाहण्यास गेल्यानंतर युवतीवर संशयित नरके याने अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी नरके राहत असलेल्या शास्त्रीनगर येथील घरी छापा टाकून ज्या खोलीत अत्याचार झाला, तेथील पंचनामा केला.

नरकेची ओळख पीडित युवतीच्या मैत्रिणीने करून दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मैत्रिणीला पोलीस ठाण्यात बोलावून नरकेची ओळख परेड करून घेतली होती. नरकेला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केल्याने पोलिसांचा तपास अर्धवट राहिला होता.

पोलीस निरीक्षक पाटील यांनी पुन्हा न्यायालयात अर्ज सादर करून संशयित नरके याने गुंगीचे औषध आणि खडीसाखर कोठून आणली याबाबत तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर